Nashik Kirit Somaiya :  श्रीजी होम्स हि तीन पार्टनरची संस्था असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, माधव पाटणकर, रश्मी ठाकरे आणि खुद्द उद्धव ठाकरे यांचे शेअर्स या कंपनीत आहेत. विशेष म्हणजे श्रीजी होम्स कंपनीची संस्था नोंदणी कृत नसल्याचा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीच्या माध्यमातून लाखोंचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे खळबळजनक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. 


किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार राजकीय वादंग गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यानुसार सोमय्या हे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर श्रीजी होम्स संदर्भात नवे आरोप केले आहेत. निफाड तालुक्यातील रुई येथे होत असलेल्या कांदा परिषदेसाठी किरीट सोमय्या हे नाशिकमध्ये आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे. 


ते यावेळी म्हणाले कि, श्रीजी होम्स संदर्भात सचिन वाझे हे माफीचे साक्षीदार असतील तर ठाकरेंवर कारवाई होणारच. त्याचबरोबर श्रीजी होम्स या कंपनीत तीन भागीदार असून मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, माधव पाटणकर हे श्री जी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. यामध्ये या दोघांचे अकरा टक्के शेअर्स असून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे 89 टक्के शेअर्स असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी यावेळी केला. मात्र श्रीजी होम्स या कंपनीची पोलखोल होत असल्याने मुख्यमंत्री घाबरले असून त्यांना भीती वाटते आहे, त्याचबरोबर त्यांची झोप देखील उडाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


श्रीजी होम्स नोंदणीकृत नाही.. 
किरीट सोमय्या यावेळी पत्रकार परिषदत म्हणाले कि, श्रीजी होम्स हि कंपनी फ्रॉड असून या कंपनीची अधिकृत नोंदणी नाही. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांची पाळेमुळे या प्रकरणात पुढे येणार आहेत. श्रीजी होम्स कंपनीच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयांनी कंपन्यांचे जाळे तयार केले असून ठाकरे जनतेला फसवू शकणार नाही, या सर्व कंपन्यांचा हिशोब ठाकरेंनी द्यावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 


कोणाचे किती टक्के शेअर्स?
श्रीजी होम्स या कंपनीचे तीन पार्टनर असून यामध्ये श्रीधर पाटणकर, माधव पाटणकर आणि रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे हे आहेत. जवळपास दहा हजार शेअर्स या कंपनीत गुंतवले असून ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे साडे दहा टक्के शेअर्स आहेत. तर माधव पाटणकर यांचे अर्धा टक्का शेअर्स आहेत. आणि मुख्यमनातरी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे 89 टक्के शेअर्स असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.