Nashik Fuel Rate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काल राज्यभरातील वाहनधारकांना सुखद धक्का दिला. पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी कमी केले. या इंधन दर कपातीने (Petrol Diesel Rate) सामान्य वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून मात्र पंप चालक आणि ट्रान्सपोर्ट संघटनांमध्ये काहीशी नाराजी असल्याचा सूर दिसून येत आहे. 


राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझल 3 रुपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केली असून, हा बदल मध्यरात्रीपासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. अनेक घटक किंमती निर्धारित करतात, जसे की रुपया ते यूएस डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी आदींचा परिणाम होत असतो. दरम्यान दर कपातीनंतर वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे. पेट्रोल पंप चालकानी दर कपातीचे स्वागत केले, मात्र यापूर्वी खरेदी केलेल्या इंधनामुळे आर्थिक फटका सहन करावा लागणार असल्याने हा तोटा कोण भरून देणार असा सवाल पपं चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कपातीसोबत पंप चालकांच्या जुन्या इंधनाचा विचार करण्याची मागणी संघटनांच्या माध्यमातून केली आहे. 


या दर कपातीचे शहरातील वाहन चालकांनी स्वागत केले आहे. ट्रान्स्पोर्ट असोसिएशननेही यामुळे काही अंशाने दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त केलीआहे. मात्र केंद्र सरकारने केलेल्या कपातीच्या वेळी दोन दिवसांत पेट्रोल पंप चालकांचे 6 हजार कोटींचे नुकसान झाले होते. पंप चालकांनी वाढीव दराने पेट्रोल घेतलेला होता. त्याची कमी दरात विक्री करावे लागला होती. यावेळी देखिल प्रत्येक पंप चालकांना किमान एक लाख रुपयांचा भूर्दंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नाशिक स्थित ट्रान्सपोर्ट संघटनांनी इतर राज्यातील डिझेल दराबाबत माहिती देत त्याखालोखाल महाराष्ट्र सरकारने डिझेल दर करावा अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत डिझेलच्या दराबाबत दिल्लीचे दर (89.62) सर्वात कमी आहेत. त्या खालोखाल कलकत्यातील (92.76) दर आहेत. चेन्नईत (94.24) तर राज्यात 97.28 दर (कमी केल्यानंतर 94.28) आहेत. कर्नाटकमध्ये डिझल दर 7 ते 8 रुपये कमी आहेत. राज्य शासनाने त्यांच्या दराच्या तूलनात्मक दर करण्याची मागणी ट्रान्सपोर्टर्स संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे.


नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले कि, केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने देखील पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी अशी मागणी वारंवार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून करण्यात येत होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून राज्य शासनाने पेट्रोलदरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपये कपात केली आहे. या दरकपातीच्या निर्णयाचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून स्वागत करण्यात येत असून या निर्णयामुळे राज्यातील वाहतुकदारांना इतर राज्याच्या वाहतुकदारांसोबत काम करण्यात उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.