Chhagan Bhujbal : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या ईडी कारवाईवर (ED) माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले कि, 'इडीच्या कायद्याच्या लवकर जामीन मिळत नाही.. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असल्याचा सल्ला वजा चिमटा त्यांनी यावेळी खासदार संजय राऊतांना काढला आहे. 


शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती.या पार्श्वभूमीवर आज नाशिक भुजबळांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 


तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयावर भुजबळ म्हणाले कि, एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच (Mahavikas Aghadi) होते, पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. प्रभागात इच्छुक उमेदवार असतात, त्यासाठी निवडणुकीत ते तयारी करत असल्याने वार्ड बदलला कि, त्रास होतोच. तर राज्यपालांच्या भेटीवर ते म्हणाले, राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा.. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायत मध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही.. बांठीया कमिशननमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात आहे, तसेच अहवालात अनेक त्रुटी आहेत, त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचे भुजबळांनी सांगितले. 


मंत्री मंडळ विस्तारावर म्हणाले.... 
तर माजी मंत्री भुजबळ मंत्री मंडळ विस्तारावर म्हणाले कि, 5 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू असून ती कशी सुटते बघावे लागणार आहे. तर संजय राऊतांच्या ईडी कारवाईवर ते म्हणाले कि, ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही.. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी केला. तर राज्याचे मुख्यमंत्री रात्री 2 पर्यंत जागतात, प्रवास करतात.. आपल्याला पण देह आहे, त्याची परिसीमा आहे. थोडा पॉझ घ्यावा लागतोच. दोनच मंत्री आहे. 


संजय राऊतांवर शरद पवार गप्प का?
खासदार संजय राऊतांवर शरद पवार गप्प का? असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, असे काही नाही. लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादी बोलते, सुप्रियाताई बोलत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी म्हंटले आहे कि हा कायदा राक्षसी आहे म्हणून. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळात चिदंबरम यांनी बनविला असल्याचे भुजबळ म्हणाले.