Nashik Crime : हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच मागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ (Caught red handed) पकडले. यात प्रवीण मनोहर जोशी व कुशल मगननाथ औचरमल अशी अटक केलेल्या दोन अधिकाऱ्यांची नवे आहे. मात्र या घटनेने पूण हा एकदा नाशिक जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचा प्रश्न पुढे आला आहे.
अहमदनगर येथील ४७ वर्षीय तक्रारदार यांच्या तक्रारींवरून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा कारवाई केली आहे. तक्रारदार यांची अहमदनगर येथे गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर हि संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना करायचा आहे. यासाठी तक्रारदार याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र आवश्यक होते. यासाठी तक्रारदार यांनी नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ गाठले.
दरम्यान नाशिक प्रदूषण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे अति पदभार सांभाळत असलेले प्रवीण मनोहर जोशी व सहकारी कुशल मगननाथ औचरमल क्षेत्र अधिकारी नाशिक कार्यालय यांनी संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात ३० हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने शहानिशा करीत सापळा रचत दोघांना तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
सापळा लावून केली अटक
अहमदनगर येथील तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार नाशिक एसीबीकडे केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयात सापळा लावून पंचा समक्ष दोघांना लाच घेताना अटक केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. नाशिक अनिल बागूल यांच्या पथकाने किरण अहिरराव, अजय गरुड, वैभव देशमुख, नितीन डावखर यांच्या पथकाने केली. तसेच सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.