Nashik Tirth Dham : नाशिक (Nashik) शहरालगतच्या देवळाली कॅम्प (Deolali camp) येथे तीस हजार चौरस फूट जागेत जैन धर्मियांच्या (Jain Mandir) 24 तीर्थकारांचे मंदिर साकारण्यात आले आहे. 81 बाय 81 असे 6561 चौरस फुटांचे हे बिनखांबी तीर्थधाम आहे. विशेष म्हणजे अशा स्वरूपाच्या वास्तुकलेचे बांधकाम असणारे जैन धर्मियांचे देशातील पहिलेच मंदिर ठरले आहे.


धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सौंदर्यात आणखी भर पाडणारी एक वास्तू देवळाली कॅम्प परिसरात उभी राहिली आहे. ही वास्तू म्हणजे कलापूर्णम (Kalapurnam) तीर्थधाम. देवळाली कॅम्प लॅम रोड परिसरात जैन बांधवांची मोठी संख्या आहे. मुंबई स्थित गुणोपासक परिवार ट्रस्टने जैन अध्यात्म योगी संत आचार्य कलापूर्णम सुरीश्वरजी यांच्या आशीर्वादाने व प्रवचन प्रभावक आचार्यदेव श्री तत्व दर्शन सूरीश्वर महाराज यांच्या प्रेरणेने तब्बल साठ हजार चौरस फूट जागेमध्ये दोन मजली भव्य, तब्बल एक लाख टनापेक्षा अधिक मकराना संगमरवरी दगडात हे कलापूर्णम तीर्थ साकार झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांपासून दीडशेहून अधिक कारागीर मंदिराच्या निर्मितीसाठी अविरत परिश्रम घेत होते. मुनिसुव्रत स्वामी यांची भव्यमूर्ती मुख्य गाभाऱ्यात असणार आहे, तर 360 अंशांमध्ये उर्वरित 23 तीर्थकारांचे दर्शन होणार आहे. 


या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे छतावर साकार करण्यात आलेल्या कलाकुसरीत एकाही डिझाईनचा दुसऱ्यांदा कुठेही वापर करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर मंदिराच्या आतमध्ये संगमरवरी दगडावर देखील खास प्रकारची कलाकुसर करण्यात आली आहे. या मंदिरामुळे शहराच्या धार्मिक पर्यटनातदेखील भर पडणार असून देशभरातून जैनबांधव कलापूर्णमच्या दर्शनासाठी येणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे देशात पहिलेच ठरणार या मंदिराचे काम झाले असून ते भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. तीन मार्च रोजी मुहूर्तावर मंदिरात अंजनशलाका प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळा होणार आहे. या निमित्ताने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच विविध प्रकारच्या धार्मिक विधी व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_mKW5VWKgjc" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" allowfullscreen></iframe>


दरम्यान आजपासून कलापूर्णम मंदिराच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून मंदिराच्या गाभाऱ्यात कलश स्थापना करत प्रारंभ करण्यात आला आहे. या धार्मिक विधीसाठी विहिरीतील जल आणल्यानंतर या जलाची यात्रा काढण्यात आली. यानंतर आचार्य सुरीश्वर महाराज व इतर सहकारी वर्गाने धामिर्क विधीसह जलपूजन करण्यात आले. जवळपास दीड एकर जागेत उभारलेल्या कलापूर्णम तीर्थधाममधील 81 बाय 81 चौरस फुटाच्या रंगमंडपात एकही खांब नाही. देशातील अशाप्रकारचे हे पहिलंच मंदिर (तीर्थधाम) असल्याचा दावा मंदिर संस्थानकडून करण्यात येत आहे.