Nashik ZP Teacher : नाशिक (Nashik) जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी (Nashik ZP Teacher) विनोबा ऍपचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी ओपन लिंक्स फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या ऍप (Vinoba App) मध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ओपन लिंक्स फाऊंडेशन चे संजय दालमिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थिती सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 


शिक्षणाच्या अनुभवाबाबतीत शाळेतील 90 टक्के विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो. "विनोबा" हा एक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ऍप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारीत K -10  शिक्षण पध्द्ती आणण्याचा प्रयत्न आहे.  शिक्षकांचा दैंनदिन कामातील वेळ वाचवून शिक्षकांना काही अर्थपूर्ण काम करण्यास वेळ मिळावा व यासाठी आमचा प्रयत्न आहे. विनोबा" हे शिक्षकांसाठी एक असे व्यासपीठ आहे. ज्यावर शिक्षक त्यांनी केलेले काम इतरांबरोबर शेअर करतात, इतरांच्या पोस्ट्स मधून शिकतात, तसेच चांगल्या कामासाठी त्यांचा गौरव देखील केला जातो. शिक्षकांना सोपे व्हावे व त्यांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता यावे यासाठी पाठांचे नियोजन,  उपक्रम, कार्यपत्रके, नेमुन दिलेली/पूर्ण केलेली कामे (असाइन्मेंट्स ) इथे सहज उपलब्ध होतात. 



शेअर करा आणि शिका 
ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांमधील शिक्षक त्यांचे काम, जसे - क्लब उपक्रम , प्रकल्प, शिक्षण साधने, वर्गात वापरलेल्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी, शिक्षकांचे वैशिष्ठ्यपूर्ण अनुभव वगैरे इथे सहज शेअर करू शकतात. तुम्ही इतर शिक्षकांनी केलेले काम पाहू शकता, त्याला लाईक करू शकता व त्यातून शिकू शकता. तुम्ही पोस्ट केलेले तुमचे काम क्लस्टर प्रमुख, ब्लॉक प्रमुख तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी देखील पहातात. शिक्षकांच्या चांगल्या कामाचे क्लस्टर प्रमुख, ब्लॉक प्रमुख तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या कडून कौतुक होते. लोकप्रिय होणाऱ्या पोस्ट्स ना :पोस्ट ऑफ द मंथ " म्हणून जिल्हा स्तर, ब्लॉक स्तर, क्लस्टर स्तर तसेच शाळा स्तरावर गौरवले जाते. जिल्हा स्तरावर पोस्ट ऑफ द मंथ जिंकणाऱ्या शिक्षकांचा जिल्हा शिक्षण परिषदे मध्ये सत्कार केला जातो. नोव्हेंबरपर्यंत अशा २१ पोस्ट्स ना जिल्हास्तरीय पोस्ट ऑफ द मंथ हा गौरव मिळाला आहे. 



कार्यक्रमाचे समन्वयासाठी देखील उपयुक्त 
'विनोबा" या ऍपचा उपयोग एखाद्या कार्यक्रमासंबंधी संवाद साधण्यासाठी तसेच अभिप्राय देण्यासाठी ही केला जातो. जसे निपुण भारत (FLN) या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य वितरित करणे, विविध शैक्षणिक स्तरांवर विद्यार्थ्यांची माहिती जमा करणे, निपुण भारत मध्ये सांगितलेले उपाय वापरून विद्यार्थी व शाळांमधील प्रगतीचा मागोवा घेणे या करता "विनोबा" ऍपचा उपयोग होतो. शिक्षण परिषदेच्या पूर्व चाचणी व उत्तर चाचणी करता, शाळा सुधार कार्यक्रम, साधन व्यक्ती, आणि शाळा व्यवस्थापन समिती च्या कार्यक्रमासाठी देखील "विनोबा" हा कार्यक्रम वापरला जातो.  आता तो गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी देखील वापरला जात आहे.


शिक्षक आणि प्रशासनाचा वेळ वाचतो
शिक्षकांचा त्यांच्या दैंनदिन कामांमध्ये काही गोष्टी जमवण्यात व देण्यामध्ये खूप वेळ जातो. असा वाया जाणारा वेळ "विनोबा" च्या वापराने वाचवता येतो.  जसे शाळेचा पोर्टफोलिओ - शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केलेलया उपक्रमांनी शाळेचा पोर्टफोलिओ बनतो. शिक्षकांच्या पोस्ट्स आणि मिळालेले पुरस्कार आपोआपच संग्रहित होतात व पोर्टफोलिओ बनतो. -विद्यार्थ्यांचे सामाजिक वर्गीकरण करणे - हि माहिती विविध वर्गांकरिता पुन्हा पुन्हा मागितली जाते. - जसे मागास वर्गीय, भटक्या व विमुक्त जमाती, अल्पसंख्याक, दारिद्र्य रेषेच्या खालील मुले, मुली वगैरे यांची माहिती विनोबा मध्ये शिक्षक ही माहिती एका ठिकाणी ठेऊ शकतात व हवे तेव्हा त्यात सुधारणा करू शकतात. यातुन त्यांचा वेळ वाचतो. सर्कल प्रमुख, ब्लॉक प्रमुख येथून त्यांना हवा तो अहवाल काढून घेऊ शकतात. - वारंवार द्यावी लागणारी माहिती जसे पुस्तक वितरण, गणवेश वितरण, पायाभूत सुविधा बद्दल माहिती हे देखील "विनोबा" कार्यक्रमातून प्राप्त होऊ शकते व शिक्षकांचा वेळ वाचतो.