Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे (udhhavThackeray) यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाला शिवसेनेने (shisvena) पुन्हा धक्का दिला आहे. जवळपास तीन माजी नगरसेवकांसह उपमहानगर प्रमुखाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा ठाकरे गळती लागल्याचे चित्र आहे. 


उध्दव ठाकरे यांची मालेगांवमध्ये (Malegaon) सभा होत असतानाच शिंदे गटाचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे. शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहेत. नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात (Nashik Shivsena) अकरा वाजेच्या सुमारास प्रवेश झाला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची तोफ मालेगाव धडाडणार असताना दुसरीकडे ठाकरे गटाला शिंदे गटाला सुरुंग लागला आहे. 


आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत असून खेडनंतरची दुसरी मोठी सभा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांपासून नाशिक शहरासह मालेगावात ठाण मांडून आहेत. मात्र दुसरीकडे नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षाने ठाकरे गटाला सुरुंग लावला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. शिवाय आज उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये असताना ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जात असल्याने ठाकरे गटाला चांगला धक्का बसला आहे.


आज ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा प्रवेशसोहळा होत असून अनेक भागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. नाशिकहून ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यासह माजी नगरसेविकाश्यामला हेमंत दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील आशा अनेक पदाधिकारी प्रवेश सोहळा होणार आहे.


मालेगावात उर्दू भाषेचे होर्डिंग 


मालेगाव शहरात आज शिवसेना ठाकरे गटाची जाहीर सभा होत असून अनेक ठिकाणी उर्दू भाषेमध्ये देखील होर्डिंग लागलेले आहेत. 'शिवसेनेचे मालेगाव मालेगावची शिवसेना' अशा स्वरूपाचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये या होर्डिंगविषयी त्याचबरोबर मालेगावमध्ये होणाऱ्या सभेविषयी उत्सुकता आहे. याआधी देखील शिवसेनेचे कॅलेंडर उर्दू भाषेमध्ये छापण्यात आलेले होते. त्यावर देखील टीका झालेली होती. आजही संजय राऊत यांनी सांगितलं की उर्दू भाषा ही सर्वांची भाषा आहे, उर्दू भाषेमध्ये जर होर्डिंग छापले तर त्यामध्ये गैर काय? अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. इथल्या मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्यासाठी अशा उर्दू भाषेतील होर्डिंग लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र खासदार संजय राऊत यांच्याकडूनया होर्डिंग्सचे समर्थन करण्यात आले आहे.