Nashik Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानतात. बीजेपीच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी अरविंद केजरीवाल -उद्धव ठाकरे भेटीवर दिली.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये (Nashik) असून आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे केजरीवाल (Arvind kejrival) भेटी आपली प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानतात. बीजेपीच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहेत. वर्षभरात निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे हालचालींना प्रारंभ झाला आहे. दक्षिण भारतातील मंडळी देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु आहेत. सगळे पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे, जर असं होत असेल तर ते चांगलंच आहे, कारण महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, नोटबंदी विरोधी बोलणार्यांवर कारवाई असेल या सगळ्या गोष्टींचा मारा होत आहे, नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. लोकशाहीवर प्रेम आहे, त्यांना असे आवडत नाही, त्यामुळे लहान लहान पक्ष देखील भाजप विरोधात सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
औरंगाबादच्या (Aurangabad) नामातारांवर भुजबळ म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षापासून मागणी होती. महाविकास आघाडी होती, त्यावेळी मंत्रिमंडळांनेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन्ही ठराव मंजूर केले होते. आनंद आहे, बाळासाहेबांची इच्छा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची ही मागणी मंजूर करण्यात आली. थोडे दिवस आता जे लोक संभाजीनगर वापरत नव्हते, त्यांच्या तोंडात औरंगाबाद वगैरे येत राहील. बॉम्बेचे मुंबई झाल्यानंतर जगात मुंबई-मुंबई झालेले आपण पाहिलं. हळूहळू सवय होईल, विमानात बसल्यानंतर अनाउन्समेंट होईल, शब्द कानावर पडतील, तेव्हा संभाजीनगर, धाराशिव म्हणायची सवय होईल, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान औरंगाबादच्या नामातारांवर एमआयएमने विरोध केला असून आज आंदोलन करण्यात येणार असल्याचे समजते. यावर भुजबळ म्हणाले की, कुठलाही एखादा निर्णय, एखादा विषय सगळ्यांनाच पटतो असे नाही, काही लोक त्याला विरोध करणारच. पण मला असं वाटतं की तो विषय जवळ जवळ आता संपलेला आहे. तर कसबा निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याच्या आरोप करण्यात आला आहे. यावर भुजबळ म्हणाले कि, पोलिसांच्या मदतीने जर पैसे वाटप झाले असेल तर अतिशय गंभीर गोष्ट आहे. आतापर्यंत बीजेपी अनेक यंत्रणांचा वापर करून घेते, असा आरोप आहे. जर निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप असा आरोप आहे, तर निश्चितपणे सगळ्यांनी गंभीरपणे घ्यायला हवं, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
कांद्याचा प्रश्न गंभीर
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना पत्र पाठवले आहे. शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली असून दुसरीकडे कांदा निर्यात थांबवली जात आहे. कशासाठी? ज्या वेळेला कांदा एक्सपोर्ट होईल, त्या वेळेला दोन पैसे जास्त भेटतील. कांद्याचा भाव ज्यावेळी प्रचंड वाढतो, त्यावेळी मध्ये मध्ये येऊ नका. याविषयी मी पवार साहेबांशी बोललो आहे, आम्ही पत्र देखील पाठवले आहे. कांदा एक्सपोर्टसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अनेक देशात कांद्याचा तुटवडा आहे, मग एक्सपोर्ट का होत नाही. सरकारने केंद्रीय कृषिमंत्री तसेच राज्य सरकारने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी विनंतीही भुजबळ यांनी केली.