Nashik News : आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ऑक्टोबर 2026 रोजी या सिहंस्थ सोहळ्याला सुरवात होणार असल्याची माहिती उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील पंच दंशानं जुना आखाड्याचे महामंत्री हरी गिरी महाराज यांनी दिली आहे. हरिगिरी महाराज आज नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे आले होते, त्यावेळी त्यांनी हि माहिती दिली. 


दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो. हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहबाद, उज्जैन आणि नाशिकमध्य़े भरतो. जेथे देश-विदेशातून अनेक भाविक येत असतात. दरम्यान 2026 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज त्रयंबकेश्वर येथे पंच दंशानं आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज हे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले होते. कुशावर्तावर स्नानांसह गंगापूजन केल्यानंतर त्यांनी कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 


त्र्यंबकेश्वर येथे आज महामंत्री हरीगिरी महाराजांसह जुना आखाड्याचे साधू यांनी कुशावर्तावर स्नान करीत शिस्त कुंभमेळ्याच्या म्हणजेच 2026-27 ला होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्याची तारखा जाहीर केले आहेत. तसेच जुना आखाड्याची उपाध्याय पंडित त्रिविक्रम जोशी, जयंत शिखरे यांनी सिंहस्थ शाही स्नानाच्या तारखा तिथीप्रमाणे निश्चित केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. त्यानुसार सिहंस्थ ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 रोजी, 2 ऑगस्ट 2017 रोजी प्रथम शाही स्नान त्यानंतर 31 ऑगस्ट 2017 रोजी द्वितीय शाही स्नान, तर 12 सप्टेंबर 2017 रोजी तृतीय शाही स्नान आणि 24 सप्टेंबर 2018 रोजी सिहंस्थ समाप्ती असणार आहे. 


दरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरातील परशुराम कुंडाच्या संवर्धन कामाची सुरुवात यावेळी करण्यात आली. हॉटेल सितारापासून महामंडलेश्वरनगर रस्त्यास पंच दशनाम जुना आखाडा गुरु गादी मार्ग असे तर बिल्वतीर्थ ते निल पर्वत रस्त्यास नीलकंठेश्वर महादेव मार्ग असे नामकरण करण्यात आले.  कुंभमेळा पर्व 31 आक्टोंबर 2026 मध्ये परवाने सुरू होणार आहे. शाही स्नानास ऑगस्ट व सप्टेंबर 2027 या दोन महिन्यात तीन शाहीस्नान आहेत. ध्वजारोहण शाही स्नानाच्या दहा महिने अगोदर होणार आहे. 2015 मध्ये ध्वजारोहण शाही स्नानाच्या महिनाभर आधी तर सिहंस्थ पर्वकाल शाहीस्नान आटोपल्यानंतर जवळपास वर्षभर होता. आगामी सिहंस्थात आधी ध्वजारोहण होईल, त्यानंतर दहा महिन्यांनी शाहीस्नान होईल. त्यानंतर सिहंस्थ पर्वकाल संपेल. 


अशा आहेत तारखा... 
आगामी सिंहस्थ 2006-27 चे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच आज कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आला आल्या. सिंहस्थ ध्वजारोहण सुरवात 31 ऑक्टोबर 26 रोजी, प्रथम शाही स्नान आषाढ 2 ऑगस्ट 27, द्वितीय शाही स्नान 31 ऑगस्ट 27, तृतीय शाही स्नान 12 सप्टेंबर 27, सिंहस्थ समाप्ती 28 सप्टेंबर 28 अशी कार्यक्रम प्रक्रिया असणार आहे.