Nilam Gorhe : कोणाला कितीही तयारी करू द्या, आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर (Shivtirtha) गर्दी होणारच अशा विश्वास विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) उपसभापती नीलम गोर्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केला आहे. तसेच मनातील उर्मी ज्यांच्याकडे आहे, ते सर्व शिवतीर्थावर येणारच. शिवाय उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) पाठीशी असलेले सर्वच शिवसैनिक हे शिवतीर्थावर येतील, शिवसेनेचे विचार ऐकायला मिळतील, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक शिवतीर्थावर येऊन शिवसेनेच्या (Shivsena) विचारांशी एकनिष्ठ असल्याचे यांनी सांगितले आहे. 


शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. सध्या राज्यभरात दार उघड बये अभियान सुरू असून महिलांना संधी मिळावी, न्याय मिळावा यासाठी 61 मंदिरात महिला जाऊन दर्शन घेणार आहे. चांदवड, सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेणार तिथला प्रसाद शिवतीर्थावर उध्दव ठाकरे यांना देणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आहेत, इगतपुरी कातकरी समाजाच्या मुलीचे अपहरण केले जाते. कामाला जुंपले जाते, याचा अहवाल पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागितला होता, मात्र अद्याप दिला नसल्याची त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


दरम्यान नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील मुलीच्या मृत्यूबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या कि, नंदुरबारचे प्रकरण धक्कादायक असून 41 दिवस मृतदेह पुरून ठेवला जातो, तरीही न्याय मिळाला नाही. स्थानिक पोलिसांशी संवाद साधला. सूत्र हलल्यानंतर माध्यमांमधून बातमी आली. त्यानंतर ही घटना पुढे आली. लखीमपूरच्या घटनेसारखी घटना आहे. बलात्कार करायचा खून करायचा आणि आत्महत्या दाखवायची, असा फंडा सध्या चालू आहे. अमित शहा याना यांसंदर्भातील माहिती दिली, कारवाई करण्यास सांगितले, मात्र काही रिप्लाय नाही. त्याचबरोबर महागाई वाढली असून वेदांता सारखे प्रकल्प गेले, रोजगार गेल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. 


अनेक मुद्द्यांवर भर 
नाशिक प्रमाणे नवी मुंबईतील डोंगर असून ते नष्ट होत आहेत. सर्व प्रकल्प अनुत्तरित राहिले तर काम कशी होणार, सर्वसामान्य आमदारांना निधी मिळत नाही, शिवभोजन, डीपीडिसी निधी नाही. किरकोळ माणसाच्या बोलण्यावर उत्तर देऊ नका असा सल्ला मला एकाने दिला आहे, असा टोला यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. तुम्ही तयार असाल तर निवडणुकीला सामोरं जा, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले. त्याचबरोबर नुकतेच ठाकरे घराण्याशी नाळ जुळवून असलेले थापा यांच्यासंदर्भात त्या म्हणाल्या कि, थापा संदर्भात काय भाष्य करणार,थापा साधा माणूस, त्याची दिशाभूल होऊ शकते, कुठे तरी त्यांचा गैरसमज झाला असेल, मुख्यमंत्री शिंदे यांचा गैरसमज झाला अस मला वाटत. त्यांची न्यूसेसन व्हॅल्यू कमी झाल्यावर भाजप त्यांची काय अवस्था करेल याचा त्यांनी विचार करावा, असे आवाहन देखील यावेळी गोर्हे यांनी दिले.