Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहरातील कृषीनगर परिसरात बिबट्याच्या (Leopard) कातडीसह चिंकारा व नील गाईच्या शिंग तस्करी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नाशिकच्या वन कार्यालयातील वॉचमनचा मुलगा संशयित जॉन सुनील लोखंडे (John Sunil Lokhande) याला देखील कारागृहात पाठवण्यात आले आहे. बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात वनविभागाच्या (Forest) एकाचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिकच्या कृषी नगर भागात बिबट्याच्या कातडीसह तीन संशय त्यांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. वन विभागाने बनावट ग्राहक बनून संबंधितांकडून बिबट्याची खरेदी करण्यासाठी कृषी नगर परिसरात गेले होते. यावेळी त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. यामध्ये हे तिघेही संशयित महाविद्यालयाने असल्याची विद्यार्थी असल्याची बाब उघडकीस झाली होती. आठ दिवसांच्या तपासात वन पथकाने बरेच धागेदोरे हाती लागले असून असले तरी मात्र बिबट्याची ही कात्री नेमकी आली कुठून हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात वनविभागाचाच वॉचमन चा मुलगा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुंपणा शेण खात असल्याचं या प्रकरणातून अधोरेखित होत आहे. 


मागील पंधरा दिवसात जिल्ह्यातून तीन तोळ्यांना बिबट्याच्या कातडी तस्करीत अटक करण्यात आले आहे. या प्रकरणांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. संशयित लोखंडेसह सिद्धांत मनोज पाटील आणि रोहित एकनाथ आव्हाड यांना याप्रकरणी अटक झाली. संशयित लोखंडेच्या वडिलांची ही वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे चौकशी झाल्याचे समजते. पण त्यातूनही महत्त्वाचे धागेद्वारे पथकाच्या हाती लागलेले नाहीत. तिघा संशयितांपैकी लोखंडेचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. इतर दोघांपैकी एक जण फार्मसी तर दुसरा बीएससीचे शिक्षण घेत आहे. या तिघांच्या इतर साथीदारांच्या ही जबाब नोंदवण्यात आले. त्यापैकी काहींना तस्करीबाबत कल्पनाही नव्हती अशी माहिती पुढे आली. मात्र आता या तिघांची रवानगी कारागृहात झाल्याने पुढील तपास नेमका काय असणार याकडे लक्ष लागले आहे. 


वनविभाग 'तस्करीच्या' भोवऱ्यात 
दरम्यान वनविभागाकडून तपास सुरू असताना तिघा संशयतांपैकी जॉन लोखंडे हा वनविभागातील वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या मुलगा असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मागील १५ दिवसांत तीन टोळ्यांची धरपकड करण्यात आल्यानंतर आता थेट  वनविभागाशी संबंधित संशयिताचा यामध्ये समावेश असल्याने वनविभाग याबाबत ठोस पावले उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय तस्करीच्या गुन्ह्यात बिबट्याची कातडी नेमकी आली कुठून या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर याबाबतीत इतर धागेदोरे मिळण्यास मदत होईल.


महाविद्यालयिन विद्यार्थी..
संशयित आरोपींमध्ये तिन्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. संशयितांच्या सोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्यावर पथकाने कारवाई सहभाग घेतला. यामध्ये तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही उच्चशिक्षित असून तिघा संशयितांपैकी लोखंडेचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. इतर दोघांपैकी एक जण फार्मसी तर दुसरा बीएससीचे शिक्षण घेत आहे.