NIA Raid Nagar : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात (PFI) आठवडाभरात दुसऱ्यांदा तपास यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील दोघांना आज पहाटे ताब्यात घेण्यात आलं आहे. 


आज पहाटेपासून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशभरातील महत्वाच्या शहरात धाडी टाकून पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या  संघटनेच्या कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना आज पहाटे ताब्यात घेण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) च्या कार्यालये तसेच सदस्यांवर धाडी टाकल्या आहेत.  


राष्ट्रीय तपास संस्था तसेच एटीएसच्या माध्यमातून आज पुन्हा सकाळपासून पॉप्युलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह (Aurangabad) इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव येथून देखील एकाला अटक करण्यात आली. त्याचबरोबर अहमदनगर शहरातून PFI संघटनेशी निगडित असलेल्या झुबेर अब्दुल सत्तार शेख आणि संगमनेर येथून मौलाना खलिफ दिलावर शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पीएफआयवर देशात हिंसाचारासाठी भडकवणे, टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. दरम्यान PFI साठी काम करणाऱ्या झुबेर शेखला नगर शहरातील मुकुंद नगर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. 


भडकवणे, टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप 
दरम्यान पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईत नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगाव गाठत मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला ताब्यात घेण्यात आले. झुबेर अब्दुल सत्तार शेख आणि संगमनेर येथून मौलाना खलिफ दिलावर शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पीएफआयवर देशात हिंसाचारासाठी भडकवणे, टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. दरम्यान PFI साठी काम करणाऱ्या झुबेर शेखला नगर शहरातील मुकुंद नगर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. 


मालेगावमधून दोघांना अटक 
दरम्यान पाच दिवसांपूर्वी देशभरात राष्ट्रीय तपास संस्था व एटीएस कडून पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. यामध्ये पुणे, औरंगाबाद (Aurangabad), बीड, कोल्हापूर (Kolhapur) आदी जिल्ह्यातून हे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते. आज पुन्हा देशभरातील महत्वाच्या शहरात धाडी टाकून पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. नाशिकच्या (Nashik) मालेगाव येथून देखील पुन्हा दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.