Sinnar Accident : सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) मुसळगाव एमआयडीसी (Musalgaon MIDC) शिवारात खाजगी बसच्या (Traval Bus) धडकेत दोन साईभक्त ठार झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. अपघातांतर फरार खाजगी बस एमआयडीसी पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत खाजगी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काही दिवसांपूर्वी  नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) मोहदरी घाटात टायर फुटून झालेल्या अपघातात पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल पहाटे मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिन्नर शिर्डी रस्त्यावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. अपघातातील मुंबई येथील दोन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. संजय शंभू जाधव महेश शंकर सिंग असे या दोघांची नावे आहेत. हे दोघेही शिर्डीला जाणाऱ्या पदयात्रेत सहभागी झाले होते. मुंबई येथील साई संस्कृती फाउंडेशन व राज प्रतिष्ठांच्या वतीने काढण्यात आलेली पायी पालखी दिंडी ते सहभागी झाले होते. दरम्यान सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या कार्यालयाजवळ पालखी मुक्कामी होती. 


दरम्यान काल पहाटेच्या सुमारास साई पदयात्रेकरू शिर्डी रस्त्याने जात असताना मुंबईकडून शिर्डी कडे जाणाऱ्या खाजगी बसने संजय जाधव व महेश सिंग या दोघां पदयात्रेकरुंना धडक दिली. त्यानंतर खाजगी बस शिर्डीकडे फरार झाली. यात्रेत सहभागी सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने गंभीर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार आधी दोघांचा मृत्यू झाला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक त्रिभुवन करत आहेत. 


सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव एमआयडीसी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन साईभक्त ठार झाल्याची घटना आज (दि.20) पहाटेच्या सुमारास घडली. पालखी मुसळगाव शिवारात आली असता बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या खासगी बसने संजय व महेशला धडक देऊन बस चालकाने पोबारा केला. धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासून शोध केला. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीकडे पथक रवाना झाले. शिर्डीत शोध घेत खासगी बस ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात बस चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


मोहदरी घाटातील अपघात 
दरम्यान काही दिवसांपूर्वी सिन्नर जवळील मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या लेनवर जाऊन दोन वाहनांवर आदळली. यात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे सर्व राहणार नाशिकचे होते, एका लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते.