Nashik News : मासिक पाळी (Menstrual cycle) आली म्हणून वृक्षारोपण (Tree Plant) करण्यापासून एका महिलेला रोखल्याच्या धक्कादायक घटना नाशकात (Nashik) घडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwer) देवगाव आश्रम शाळेत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींना झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावला आहे. या प्रकरणी पिढीत मुलींना आदिवासी विकास विभागाकडे (Tribla Development Department) तक्रार सुद्धा केलेली आहे. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) हि धक्कादायक घटना घडली असून मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी या मुलीला रोखण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी हि घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाविद्यालयाच्या शिक्षकांनीच हा प्रकार केल्याचा सदर युवतीने सांगितला आहे. दरम्यान सदर मुलीने याबाबत बोलताना सांगितले कि, या घटनेला दोन-तीन आठवडे झाले असून आम्ही शाळेत गेलो होतो, त्यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी आम्ही मुली झाडे लावायला गेलो. उपस्थित शिक्षक म्हणाले कि, मागील वर्षी लावलेली झाडे जाळून गेली आहेत, तुम्ही झाडे लावू नका, अशा आशयाचे उत्तर शिक्षकांनी दिल्याचे युवतीने सांगितले. 


दरम्यान या प्रकारानंतर संबंधित युवतीने आदिवासी विकास विभागात धाव घेतली असून या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी अधिकारी म्हणाले कि, एका विद्यार्थिनी तक्रार केली की तिला मासिक पाळी आल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखले आहे. शिवाय तुम्ही झाड लावेल तर ते मारतं असा अजब तर्कही लावला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान युवतीची तक्रार मिळाली असून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


दोनच दिवसांपूर्वी देशाच्या राष्ट्रपतीपदी (President) एक आदिवासी महिला विराजमान झाल्या. तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थिनींना अजब अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. त्र्यंबक येथील शाळेवर विद्यार्थिनीला आलेल्या मासिक पाळीमुळे शिक्षकाने वृक्षारोपण करण्यापासून रोखलं. हि खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणी चौकशी करून शिक्षकांवर कारवाई करू, प्रकल्प अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल आल्यानंतर त्यानुसार संबंधित शिक्षकांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


याबाबत कृष्णा चांदगुडे म्हणाले कि, स्त्रीला मासिक पाळी आली असतांना  झाड लावल्यास झाडाची वाढ होत नाही अथवा ते जळुन जाते, असे समजणे म्हणजे निखालसपणे अंधश्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणे जसे घटनेत कर्तव्य सांगितले आहे. तसे शिक्षणाच्या गाभा घटकात सुद्धा त्याची नोंद आहे. शिक्षकाचे सदरचे कृत्य हे त्या विरोधात असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. महाराष्ट्र अंनिस सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.


महत्वाच्या बातम्या : 


Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात मागील सहा महिन्यात 322 जणांना सर्पदंश, गोल्डन अवर्स किती महत्त्वाचे?


Nashik Ganeshotsav : नाशिकच्या गणेशोत्सवात यंदा ढोल पथकांचा 'नादब्रम्ह', दोन वर्षांनंतर पुन्हा 'धीना धीं धा'....


Nashik : नाशिककरांनाही रानभाज्यांची चव चाखता येणार, पंचायत समितीत खास रानभाज्या महोत्सव