MLA Dada Bhuse : 'व्यक्तिगत पातळीवर स्वार्थासाठी व दबावापोटी बंडखोरीचा निर्णय घेतला नाही,' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakaray) यांनी दिलेले आशीर्वाद व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एक शिवसैनिक ते कृषी मंत्री पदापर्यंतचा प्रवास करू शकलो, शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करीत राहील. अशा शब्दांत दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आपले बंडखोरीबाबत मत मांडले. 


राज्यातील सत्तानाट्यानंतर दादा भुसे पहिल्यांदाच मालेगावी (Malegoan) आले होते. यावेळी त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. मालेगाव येथील बालाजी लॉन्स येथे संवाद अमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी समर्थकांशी संवाद साधत त्यांनी बंडखोरी मागील कहाणी सांगितली. ते यावेळी म्हणाले कि, 'व्यक्तिगत पातळीवर स्वार्थासाठी व दबावापोटी बंडखोरीचा निर्णय घेतला नाही,' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आशीर्वाद व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एक शिवसैनिक ते कृषी मंत्री पदापर्यंतचा प्रवास करू शकलो, शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करीत राहील, असेही ते यावेळी म्हणाले. 


तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कायमच आपले दैवत राहतील. मालेगावच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार दादा भुसे यांनी केले. राज्यातील सत्तत्तर नाट्यानंतर दादा भुसे हे मंगळवारी मालेगावी दाखल झाले. या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करताना दादा भुसे म्हणाले कि शिवसेनेने मला भरभरून दिले आहे. निर्णय घेत असताना व्यक्तिगत पातळीवर दुःख होत होते. कोणाच्या दबावापोटी निर्णय घेण्यात आला नाही. शिवसेनेने कोणाच्या विरोधात व बाजूला नसल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले. 


दादा भुसे शिंदे गटात -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडले. आता शिंदे गटाकडे शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत. यामध्ये मालेगाव मध्यचे आमदार माजी कृषिमंत्री दादा भुसेसह सुहास कांदे हे सहभागी आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महत्वाचे दोन मावळे शिंदे गटात सामील झाल्याने नाशिकमध्ये शिवसेना मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता मालेगावातून दादा भुसे हे निवडून आले असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेना येथून उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दादा भुसे यांना हे जाड जाईल का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र दादा भुसेंचे समर्थकही हजारो असल्याने त्यांची बाजू देखील भक्कम असल्याचे चित्र आहे.