Nashik Corona Crisis : कोरोना (Corona) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून नाशिकमध्ये देखील कोरोना बाधितांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. बुधवारी जिल्ह्यात 40 रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. 48 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 190 असून सद्यःस्थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 366 वर पोहोचली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत हि संख्या 08 ने कमी झाली आहे.
शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी करोनाची संख्या नाशिककरांसाठी पुन्हा धोक्याची घंटा ठरत आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.06) दिवसभरात तब्बल 40 कोरोनाबाधित आढळून आले. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक 32 रुग्ण आहेत तर 08 ग्रामीणमधील आहेत. यामुळे उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांची संख्या आता 400 च्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तर दिवसभरात 56 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकमध्ये देखील करोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचा आकडा वाढतांना दिसत आहे. मागील रविवारी तब्बल ५५ नागरिक बाधित आढळून आल्याने रुग्णसंख्येत घाट झाली होती. मात्र काल मंगळवार रोजी नव्याने दिवसभरात तब्बल 82रुग्ण बाधित आढळून आल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात 32, नाशिक ग्रामीण भागात 5, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक, जिल्हाबाहेरील 02 अशा एकूण 40 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या सक्रिय असलेल्या 366 बाधितांपैकी 202 बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील बाधितांची संख्यादेखील शंभराहून अधिक झाली असून, 150 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात दहा, तर जिल्हाबाहेरील १६ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. बुधवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.15 टक्के राहिला.
अशी आहे नाशिक जिल्ह्यातील सद्यस्थिती
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण - 56
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ : 40
नाशिक मनपा 32
नाशिक ग्रामीण 05
मालेगाव मनपा 01
जिल्हा बाह्य 02
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 8899
आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण : 366