Chhaagn Bhujbal : नितीन गडकरी (Nitin Gadkri) यांनी कारने प्रवास करावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील याबाबत सांगितले होते. गडकरी यांना कामाच्या व्यापामध्ये रस्त्याने शक्य होत नसेल तर जाताना हेलिकॉप्टर मधून जाताना रस्त्याची अवस्था पाहावी अशी विनंती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नितीन गडकरी यांना केली आहे. 


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवशीय नाशिक दौरयावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नाशिक मुंबई (Nashik Mumbai Highway) रस्त्याच्या अवस्थेबद्दल माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता गडकरींना महामार्गासंदर्भात जाब विनंती करणार असल्याचे सांगितले. नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गडकरी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शक्य असल्यास त्यांनी मुंबई नाशिक असा कारने प्रवास करावा अन्यथा जाताना हेलिकॉप्टरमधून रस्त्याची पाहणी करावी, असे भुजबळ म्हणाले. यूपीआयच्या काळामध्ये ज्यावेळेला नाशिक मुंबई महामार्गाचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीपुढील काही वर्षांत दोन्ही बाजूने एक एक लेन वाढविण्यात येईल, नंतर वेळोवेळी डागडुजी होईल, असा आराखडा तयार करण्यात आला. मात्र तसे झालं नाही, आणि नाशिक मुंबई रस्त्याची वाट लागली. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहा तासांत माणूस येऊ शकत नाही. 


भुजबळ पुढे म्हणाले, गडकरी नाशिक मध्ये येऊन घोषणा केली आहे, नाशिक मुंबई काँक्रीटीकरण करणार असल्याची घोषणा केली होती, पूर्ण रस्ता मुंबईपर्यंत काँक्रीटीकरण करणारा काम सुरू करा तोपर्यंत जे आहे हे रस्त्याच्या सुस्थितीत कसे असतील हे पाहायला पाहिजे. कारण लाखो वाहन दक्षिण भारतातून मुंबई येथे जात असतात. उत्तरेकडे जाणारा हा सगळ्यात जुना महामार्ग असून याच्याकडे जरा जास्त लक्ष देऊन त्या कामाला कसे द्यावे अशी विनंती गडकरींना करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. 


गडकरी यांनी कारने प्रवास करावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील याबाबत सांगितले होते. गडकरी यांना कामाच्या व्यापामध्ये रस्त्याने शक्य होत नसेल तर जाताना हेलिकॉप्टर मधून जाताना रस्त्याची अवस्था बघा, अनेकांनी नाशिक मुंबई रस्त्यांबाबत आवाज उठवला. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आता मात्र नाशिक मुंबई महामार्ग वाहन चालविण्या योग्य झाला नाही तर कडक कारवाई करू. मात्र त्यासाठी टोल वगैरे बंद करणार नाही. कारण टोल बंद केल्याने टोलधारकाचे नुकसान होत नाही, त्यांना दिवस वाढवून मिळतात. मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या संबंधित कंपन्यांच्या ऑफिसवर धडक मारणे गरजचे. विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांचे रस्त्यावर लक्ष ठेवून असतात. रस्त्याची दुरावस्था झाल्यास ते काम करून घेणे अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर धडक मोहीम सुरू करणार आहोत. नाशिक मुंबईला हायवेला नॅशनल हायवे म्हणता येणार नसल्याचा खेदजनक निर्वाळा छगन भुजबळ यांनी दिला.