Igatpuri Crime : नाशिकचे (Nashik) इगतपुरी शहर (Igatpuri) खुनाच्या घटनेने (Murder) हादरले असून पहाटेच्या सुमारास विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


इगतपुरी शहरातील गायकवाड भागात राहणाऱ्या विवाहित महिलेवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचे तिचा मृत्यू झाला आहे. जकीया शेख असे मृत महिलेचे नाव आहे.


इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथील विवाहित महिला जकीया शेख वास्तव्यास होत्या. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गायकवाड नगर येथील संशयित आणि त्याच्या आईत झालेला वाद मिटविण्यासाठी जकीया शेख गेली होती. वाद सोडविल्यानंतर संशयितांने हा राग मनात धरून संशयितांने धारदार शस्त्राने भोसकून जकीया शेख यांचा खून केला.


दरम्यान घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी (Igatpuri Police) घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत संशयित फरार झाले होते. मात्र पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या खुनात सात संशयित असल्याची माहिती आहे. या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यातील ही तिसरी खुनाची घटना असल्याने शहर वासीयांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. 


संशयित फरार
इगतपुरी शहरात महिलेची हत्या झाल्याने शहर पुन्हा हादरले आहे. मागील सात महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने शहराचे गुन्हेगारी फोफावत चालली असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.


तिसरी खुनाची घटना 
इगतपुरी शहरात आज पहाटेच्या सुमारास घटनेने शहर हादरले असून शहरात नागरिक दहशतीखाली आहेत. मागील सात महिन्यातील तिसरी घटना असल्याने शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी याबाबत वेळीच पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे