MLA Nitin Pawar : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे प्रथमच नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगाव जिल्हा (Malegoan) निर्मितीच्या चर्चाना उधाण आले आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांतून या निर्मितीला जोरदार विरोध होत असून कळवणचे (Kalwan) आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी कळवण आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांचा दौरा निश्चित झाल्यापासून मालेगाव जिल्हा निर्मितीच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे मालेगावकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने देखील याबाबतची संपूर्ण माहिती तयार ठेवली असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा निर्मिती बाबत आमदार ददभूसे हे सकारात्मक असून ते मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रस्ताव सादर करणार आहेत. मात्र असे असताना जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आदी तालुक्यांतून या निर्मितीला विरोध करण्यात येत आहे. याबाबत कळवणचे आमदार नितीन पवार यांनी भूमिका मांडली आहे. 


पेठ, दिंडोरी या भागाच्या समावेशाला कळवणचे आमदार नितीन पवार यांनी विरोध दर्शवला आहे. कळवणला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता द्यावी. अशी मागणी  कळवण मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी केली आहे. दरम्यान शिंदे यांच्या दौऱ्यात मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मालेगाव जिल्ह्यात कळवणसह इतर आदिवासी भागाचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. मात्र मालेगाव जिल्ह्यात कळवण, पेठ, दिंडोरी या भागाच्या समावेशाला कळवणचे आमदार नितीन पवार यांनी विरोध दर्शवला आहे. 


मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येते. मात्र मालेगावच्या आजूबाजूच्या तालुक्यांचा या मागणीला सातत्याने विरोध होत आहे. त्यामध्ये कळवण हा जो आदिवासी बहुल तालुका आहेत. इथल्या लोकप्रतिनिधींचा नागरिकांचा विरोध आहे. पेठ, सुरगाणा तालुक्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर चांदवड हा थोडा सधन भाग असल्याने हा तालुका देखील विरोधाच्या भूमिकेत आहे. या सर्व तालुक्यातील नागरिकांचा तिथल्या लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. आम्हाला मालेगाव जिल्ह्यामध्ये न जाता आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये ठेवावं अशी त्यांची सातत्याने मागणी आहे. 


आमदार नितीन पवार म्हणाले.... 
कळवणसह पेठ, दिंडोरी, सुरगाणा आदी भागातील तमाम आदिवासी बांधवांचा मालेगाव जिल्हा निर्मीतीला विरोध आहे. मालेगाव जिल्हा झाल्यास आमचा त्यामध्ये समावेश करू नये. 1995 पासून एटी पवार यांनी मागणी केली होती कि, आमचा स्वतंत्र आदिवासी जिल्हा करावा. नंदुरबार आणि पालघरच्या धर्तीवर कारण की आमचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आदिवासी जिल्हा केल्यास निश्चित आम्हाला फायदा होईल. त्याला काही वेगळे बजेट लागणार नाही आदिवासी विकास विभागाचे 9 स्वतंत्र बजेट असतं. त्याच्यामुळे कुठल्याही ताण पडणार नाही म्हणून कळवण हा आदिवासी जिल्हा करावा अशी शासन दरबारी विनंती त्यांनी केली आहे.