Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह (Nashik) परिसरात बिबट्याच्या (Leopard) कातडीसह इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचे प्रमाण वाढतच चालले आहे. गेल्या पंधरा दिवसांत तीन कारवाया झाल्या असताना आज पुन्हा दुर्मिळ कासवाची (Indian Turtle) अवैध विक्रीचा डाव वनविभागाने हाणून पाडला आहे. त्यामुळे नाशिक वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचे (Smuggling Center) केंद्र बनत चालल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्र्यंबक तालुक्यातील (Trimbakeshwer) अंबोली परिसरात वनविभागाच्या पथकाने हवेत गोळीबार करत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या संशयिताना ताब्यात घेतले होते. ही पहिली कारवाई झाल्यानंतर वनविभागाने कारवाईचा सपाटाच लावला होता. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर त्यानंतर लागलीच दिंडोरी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांन ताब्यात घेण्यात आले. 


मागील वीस दिवसांत तीन कारवाया झाल्यानंतर आज नाशिकच्या महामार्ग बस स्थानक परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या विशेष वनपथकाने वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी पुन्हा एकदा उधळली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांना मिळालेला माहिती नुसार तसेच सहायक वन संरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुरहानी फिश एक्वेरियम महामार्ग बसस्टँड समोर नाशिक यांचा दुकानात प्रत्यक्ष जाऊन झडती घेतली. यावेळी सदर दुकानात इंडियन टर्टल प्रजातीचे एक कासव मिळून आले. 


सदरचे कासव भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या अनुसूचितमध्ये समाविष्ट व संरक्षित असल्याने संबधित दुर्मिळ  कासवाची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने तातडीने कार्यवाही करीत दुर्मिळ कासवाला ताब्यात घेतले. दुकानाचे चालक संशयित खोजेमा असगरअली तीन्वाला  यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदे अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे नाशिकचे वनपाल अनिल अहिरराव यांच्या पथकाने केली आहे. 


वीस दिवसांत चौथी कारवाई 
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसात वन्यप्राण्यांच्या अवयवयांची तस्करी होत असल्याच्या तिन घटना समोर आल्याने खळबळ उडालेली असतांनाच आता कासवाची अवैध प्रक्रारे विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय. शहरातील मुंबई नाका या वर्दळीच्या परिसरातील बुरहानी फिश ऍक्वेरीयम या दुकानात एक इंडियन टेन्ट कासव विक्रीसाठी ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या पथकाने गुरुवारी ईथे छापा टाकत कासवाला सुखरूप ताब्यात घेत दुकानमालक खोजेमा असगरअली तिन्वाला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर वन्यजीव अधिनियम 1972  अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला.