Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्हा खुनाच्या घटनांनी (Murder) हादरला आहे. शनिवारी कळवण (Kalwan) तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीचा घाव घालत निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत खुनाचा उलगडा केला असून, मयत कोल्हे दाम्पत्याचा नातवाला खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. 


कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील वेरूळे गावात राहणाऱ्या वयोवृध्द नारायण मोहन कोल्हे व त्यांची पत्नी सखुबाई कोल्हे यांचा कोणीतरी अज्ञात संशयिताने डोक्यात कु-हाडीने वार करून खून केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. दुहेरी खूनाच्या गुन्हयाचा गांभीर्याने तपास सुरू करून नाषिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग निफाड तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर पथकासोबत फॉरेंन्सीक टिम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विष्लेशण पथक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच तात्काळ तपास सूरू केला. 


नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व उपविभागीय पोलिस अधिकारी तांबे यांनी यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अगोदर या दाम्पत्याच्या नेहमी सहवासात राहणारा त्यांचा भाचा रामदास भोये याची चौकशी केली. त्यावेळी आजी-आजोबांना भेटण्यासाठी वरखेडा येथील त्यांचा नातू काळूदेखील आला असल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरापर्यंत शहाजी काळू कोल्हे याची चौकशी केल्यानंतर त्यानेच आजी-आजोबांचा खून केला असल्याचा कबुली जबाब दिला असल्याची माहिती अभोणा पोलिस ठाण्याने दिली आहे. वृद्ध दाम्पत्याकडून वेळोवेळी खर्चासाठी पैसे दिले जात नाहीत, तसेच भेदभाव करतात याचा राग डोक्यात ठेवत नातवाने त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याचे समोर आले आहे. 


दरम्यन पोलीस तपासानुसार कोल्हे यांच्या नात्यातील संशयित काळु उर्फ राजकुमार हरी कोल्हे यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वृध्द दाम्पत्याचा नात्याने नातु असून त्याला वेळोवेळी खर्चाला पैसे दिले नाही. त्याच्याशी नेहमी भेदभाव करतात या कारणावरूनमनात राग धरून त्यांचा खून केल्याची संशयिताने सांगितले. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. दरम्यान हा गुन्हा काही तासांत उघडकीस आणल्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकास 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.