Nashik Satyajeet Tambe : जशी उत्सुकता, उत्कंठा आणि मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी (First Day Of School) होती, तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात (Vidhanbhavan) सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे, अशी भावना सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत जिंकल्यानंतर आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तांबे यांनी हजेरी लावली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) आजपासून सुरु झाले. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. याच निमित्ताने शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानभवनाची पायरी चढली. यानंतर त्यांनी आपला आनंद ट्वीटच्या (Tweet) माध्यमातून व्यक्त केला आहे. सत्यजीत तांबे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. तसेच माझे आई-वडील-मामा, माझे सर्व मित्र, माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे' अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
नाशिक पदवीधर पोटनिवडणूक चर्चेत
नाशिक पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सत्यजीत तांबे चर्चेत राहिले. अवघ्या महाराष्ट्राने कधी नव्हे ती नाशिक पदवीधारची निवडणूक जवळून पाहिली आणि अनुभवली सुद्धा. यानंतर राजकीय नाट्य देखील सर्वासमोर आले. मात्र त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी मतदारसंघात जाऊन लोकांचे, मतदारांचे आभार मानले. यानंतर त्यांनी सर्व मतदारांचे, सर्व मित्रांचे आभार मानले. नुकतेच त्यांनी जेजुरी, मोरगाव, बाबीर (इंदापूर), पंढरपूर, तुळजापूर, अक्ककोट व गाणगापूर आदी ठिकाणी जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले.
दरम्यान आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले. याच पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे हे विधानभवनात उपस्थित राहिले. यावेळची स्थिती, घालमेल ट्वीटच्या माध्यमातून मांडलं. जसं शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या मनाची घालमेल असते, अगदी तशी स्थिती आज विधानभवनाच्या पायरी चढताना जाणवल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कुटुंबीय, बाळासाहेब थोरात, सर्व मित्र, मतदार, ज्येष्ठ नेते यांचे आभार मानत कामकाजाला सुरुवात करत असल्याचे म्हटलं आहे.
फडणवीस सादर करणार पहिल्यांदाच अर्थसंकल्प
अर्थ आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.