Nashik News : नाशिकच्या (Nashik) येवला (Yeola) तालुक्यात दुर्दैवी घटना घडली असून भाटगाव शिवारातील अगस्ती नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


सगळीकडे गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) वातावरण असताना येवला तालुक्यात मात्र या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दीपक दिलीप मिटके आणि तुषार देविदास उगले अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला दोघा युवकांची नावे आहेत. दीपक मिटके हा बारावी अनुत्तीर्ण होता, तर त्याचा आतेभाऊ तुषार उगले हा भाडगाव नजीक असलेल्या बाबुळगाव येथील एस एन डी शिक्षण संस्थेच्या डिप्लोमा महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. तसेच तुषार हा शिक्षणानिमित्त भडगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे मंगळवारी दुपारी बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघानाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, सहाय्यक उपनिरीक्षक किरण सोनवणे, हवालदार सचिन राऊत, मधुकर जेठे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी गावातील पट्टीच्या पोहणारे युवकांच्या मदतीने बंदरातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आले. 


दरम्यान गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आहे. या घटनेने दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भडगाव गावावर देखील शोक काळा पसरली आहे. मिटके यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश करताना महिलांनी हंबरडा फोडला. काळीज हे लावून टाकणारे चित्र वस्तीवर पाहायला मिळत होते


मालेगाव शहरात पोहताना मृत्यू
तर मालेगाव शहरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षे तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदय राऊत घटना मालेगाव शहरात घडली आहे. जयेश भारत भावसार असे मृत तरुणाचे नाव आहे. जयेश हा शिवाजीनगर भागातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता.  यावेळी पोहत असताना अचानक त्याला त्रास होऊ लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्यास पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान त्याचा त्रास वाढल्याने त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नंतर सामान्य रुग्णालयात नेण्यात आले मात्र ते आधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.


हृदयविकाराचं प्रमाण वाढलं
हल्ली युवकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. बदलती जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमुळं अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. मागील आठवड्यातच नाशिकच्या (Nashik) इंदिरानगर (Indiaranagar) येथील बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ हुदलीकर (Kaustubh Hudlikar) यांचा ट्रेकिंगसाठी गेले असता हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्याने मृत्यू झाला होता. तसेच परभणीच्या सचिन तापडिया यांचा बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं तर करण पवार या 20 वर्षीय मुलाचं देखील पोलिस भरतीदरम्यान धावताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं.