Ganesh Modak Flavors : नाशिक (Nashik) शहरात सकाळपासून लाडक्या गणरायाचे (Ganpati Bappa) आगमन मोठ्या थाटामाटात होत असून नाशिकच्या बाजारपेठा खरेदीसाठी फुलून गेली आहेत. अशातच बाप्पाचा लाडका नैवेद्य मोदक (Modak) देखील बाजारात उपलब्ध झाले असून बाप्पाना यंदा विविध प्रकारच्या मोदकांची मेजवानी असणार आहे. त्यामुळे महिलावर्ग देखील घरगुती मोदकांसह बाजारातील मोदकांना प्राधान्य देत आहेत. 


कोरोना (Corona) काळातील दोन वर्ष गणेशोत्सव (Ganeshotsav) शांततेत साजरा सजला. मात्र यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे नाशिककरांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली असून महिलावर्ग देखील मिठाईसाठी झुंबड उडाली आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारांचे मोदक बाजारात विक्रीसाठी आले आहेत. नाशिकच्या जुनी परंपरा असलेल्या मिठाईच्या दुकानांत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक पाहायला मिळत आहेत. यंदा महागाईमुळे सर्वच दरांत वाढ झाली असल्याने उकडीच्या मोदकापाठोपाठ मावा आणि इतर प्रकारच्या मोदकांचे दर देखील वाढले आहेत. 


नाशिकच्या बुधा हलवाई (Budha Halwai) या सर्वात जुन्या मिठाईच्या दुकानात जवळपास 300 किलोचे तळणीचे मोदक तयार करण्यात आले असून यासह मोदकांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तळणीचे मोदक, मावा मोदक, उकडीचे मोदक, मँगो मोदक, मोतीचुर मोदक, मलई मोदक, रोझ मोदक, चॉकलेट मोदक, अंजीर मोदक, पाईनपाल मोदक, पिस्ता मोदक आदी मोदकांची रेलचेल आहे. त्यामुळे नाशिककर देखील फ्लेवर्स मोदकांना प्राधान्य देत आहेत. गेल्या आठवडाभरापासून मिठाई बनविण्याचे काम असून दोन दिवसांपासून नाशिककर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. 


तळणीचे तीनशे किलोचे मोदक 
बाप्पाचं लाडका मोदक हा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर बनविला जातो. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या बुधा हलवाई यांनी तब्बल तीनशे किलो तळणीचे मोदक तयार केले असून यामध्ये खोबरे, रवा, खसखस आदींसह इतर पदार्थ टाकून बनविले जात आहे. दरम्यान तळणीच्या मोदकांना विशेष मागणी असून हे खाण्यासाठी देखील रुचकर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकचा महिला वर्ग देखील उकीडीच्या मोदकांसह तळणीच्या मोदक खरेदी करत आहेत. तर  बाप्पासाठी विविध फ्लेवर्सचे मोदक तयार करण्यात आले असून यामध्ये तळणीचे मोदक, मावा मोदक, उकडीचे मोदक, मँगो मोदक, मोतीचुर मोदक, मलई मोदक, रोझ मोदक, चॉकलेट मोदक, अंजीर मोदक, पाईनपाल मोदक, पिस्ता मोदक इत्यादी मोदक तयार करण्यात आले आहेत. 


असे आहेत मोदकांचे दर 
मोदक बनविण्याच्या साहित्य हे महागल्याने मोदकाच्या दारावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. बाप्पाचा आवडचा नैवेद्य म्हणून ओळख असलेल्या उकडीच्या मोदकातही 05 रुपयांनी वाढ झाली आहे. 30 ते 35 रुपये प्रतिनग असे उकडीच्या मोदकाचे दर आहेत. त्याचबरोबर मिठाईच्या दुकानांत गणेशोत्सवाच्यानिमित्ताने उपलब्ध झालेले विविध प्रकारांच्या मोदकांच्या दरांतही 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 680 रु किलोपासून 1280 रुपयांपर्यंत मोदकांचे दर आहेत. तर मलई मोदक, रोझ मोदक दर 600 किलो इतके आहे. तर मावा मोदक 480 रुपये किलो, तळणीचे मोदक 400 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत.