Nashik Copy Case : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpari Chinchwad Mahapalika) लिपिक व इतर पदाच्या भरती दरम्यान कॉपीकेसचा CopyCase) प्रकार घडला असून डमी उमेदवाराने चक्क मायक्रोफोन लावून परीक्षा सोडवता असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी नाशिकच्या (Nashik) जैन भवनजवळील परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांना ताब्यात घेतले असून गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड मनपा लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिक (Nashik) शहरातील केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टॅक्स सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा घेतली जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खोडे गावचा रहिवासी अर्जुन हरीसिंग मेहर हा परीक्षार्थी होता. मात्र त्याच्या जागेवर राहुल मोहन लागलोध हा डमी उमेदवारी परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याने बटन कॅमेरा व ब्लूटूथचा साहाय्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून बाहेर पाठवला. केंद्राबाहेर उभ्या अर्जुन रामधन राजपूत याने प्रश्नांची माहिती त्याला कळवली, अशा पद्धतीने गैरप्रकार सुरू होता. डमी उमेदवाराच्या संशयास्पद हालचालीवरून पर्यवेक्षकाला संशय आल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक व इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. 26 ते 28 मे दरम्यान राज्यात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत असताना नाशिकमध्ये रविवारी सकाळी साडेआठच्या आर्टिलरी सेंटर रोड, जैन भवनशेजारी युको बँकेच्या वर फ्यूचरटेक सोल्यूशन परीक्षा केंद्र येथे परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 21 विद्यार्थी प्रविष्ट झालेले असताना यावेळी पीसीएस कंपनीचे केंद्रप्रभारी एस. सारथ यांना एक विद्यार्थी कॉपी करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी परीक्षा केंद्रप्रमुख पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासन अधिकारी नाना जयवंत मोरे यांना याबाबत सांगितले.
बटन कॅमेरा वापरून कॉपी
दरम्यान शिक्षक व कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडले. कॉपी करणारा विद्यार्थी राहुल मोहन नागलोथ याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात डिव्हाइसमध्ये फोनचे दोन सीमकार्ड मिळाले. त्याचा कानात हेडफोन होता, तर परीक्षा केंद्राजवळ असलेल्या स्वच्छतागृहात त्याने मोबाईल लपविलेला होता. राहुलला त्याचा मित्र अर्जुन राजपूत हा फोनवरून उत्तरे सांगत होता. विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून कॉपी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर तो विद्यार्थी खऱ्या परीक्षार्थीच्या जागेवर डमी बसला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी डमी विद्यार्थ्याला अटक न्यायालयासमोर उभे केले असून न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.