Nashik News : नाशिकच्या (Nashik)  इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा मंडळ संचलित अनुसयात्मक दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील (Disabled) विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Poisoning) झालेल्या दुर्घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने (Social Welfare Department) आपला अहवाल दिव्यांग आयुक्तालयाला पाठवून सदर पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.


इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग मुलाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी विषबाधा होऊन दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर अन्य काही मुलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्यांना दिलेले जेवण पिण्याच्या पाण्याचे तपासणीसाठी दिलेल्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत असल्याने अजूनही या दुर्घटनेचा उलगडा होऊ शकला नाही. दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने या पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द केली आहे. 


सदर विद्यालयात 120 विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील 08 विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला. यात दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या दुर्घटनेनंतर दिव्यांग पुनर्वसन केंद्र बंद करण्यात आल्याने निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाचा तसेच शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे नेमकी प्रशासन जिल्हा प्रशासन या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. 


दिव्यांग पुनर्वसन केंद्राबद्दल... 
दरम्यान जून 2017 मध्ये पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा संस्थेने दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू केले होते. या केंद्रासाठी शासनाकडून कोणते अनुदान अथवा आर्थिक मदत केली जात नसून सेवा संस्थेने आपल्या देणगीदारांमार्फत हे केंद्र सुरू केल्याचे व त्यात 117 दिव्यांग शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर पाच वर्षांनी या केंद्राला मुदतवाढ देण्याची तरतूद असल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जून 2022 मध्ये सदर संस्थेला प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती. समाज कल्याण विभागांनी या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करून घेतली असून त्यांना कोणताही धोका नसल्याची खात्री पटल्यावर घरी सोडण्यात आले आहे. 


नेमकी काय घडली होती घटना
इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्ण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थां आहे. या विद्यालयात 120 विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील 08 विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर दोन विद्यार्थीची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले होते.