Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) मालेगावातील सरदार नगर भागात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 27 लाख रुपयांवर हात मारला आहे. चोरीची ही घटना सीसीटिव्हीत (CCTV) कैद झाली असून रोकड भरलेली पिशवी उचलत नसल्याने खांद्यावर ठेवून चोरटा पसार झाला. दरम्यान, यापूर्वी देखील याच भागातील मदरशांमधील हॉस्टेलमधून तीन लाखांपेक्षा अधिक रकमेची चोरी झाली होती. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे (Theft) पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


मालेगावातील (Malegaon) अन्वर अहमद यांच्या मालकीचा असलेला सुपरकिंग या पावरलुम कारखान्याच्या बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडत अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करत टेबलच्या आतल्या कप्प्यात ठेवलेले 27 लाख 160 रुपयांची रोकड लंपास केली. रक्कम जास्त असल्याने चोरट्यांनी हे पैसे अक्षरशः थैल्यात भरल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात तेथून पोबारा केला. चोरीच्या या घटनेबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस शोध घेत आहे..


गेल्या दीड महिन्यात आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Police) धाडसी चोरीचा हा दुसरा प्रकार घडला आहे. गोल्डन नगर भागात राहणाऱ्या अन्वर अहमद शकील अहमद यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. सरदार नगर मध्ये त्याचे पावरलूम सिल्वर किंग नावाची कार्यालय आहे. अज्ञात चोरट्याने या बंद कार्यालयाचे कुलूप तोडून आज प्रवेश केला. त्यानंतर कॅबिनची काच फोडून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल 27 लाखांची रोकड चोरून नेली. एका मोठ्या पिशवीत सदर रक्कम भरून चोरटा बाहेर पडला. मात्र नोटांच्या वजनामुळे त्याला पिशवी घेऊन चालणे शक्य होत नसल्याने त्याने पिशवी थेट खांद्यावर घेऊन पोबारा केला. 


संशयितांचा पोलिसांकडून शोध 


अन्वर हे शनिवारी कार्यालयात आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक एकबीर सिंग संधू आझाद नगरचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अन्वर अहमद यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली आहे. सध्या संशयित फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. आझाद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशोधकांच्या मागावर आहे. संशयित लवकरच गजाआड होईल, असे पोलिसांनी सांगितले.


ईतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Crime : खिडकीच ग्रील कापलं, बँकेतील लॉकर रूमच्या वरचा स्लॅबही फोडला, मात्र तेवढ्यात.... नाशिकची घटना