Nashik Christmas Plum Cake : जगभरात नाताळच्या (Natal) सणाचे सेलिब्रेशन सुरु झाले असून आज ख्रिसमस इव्हिनिंग (Christmas) असल्याने नाशिक (Nashik) शहरात देखील धूम पाहायला मिळत आहे. अशातच ख्रिसमस सणाला महत्वाचा भाग असलेला केकला मागणी असून यामध्ये सर्वाधिक पसंती दिली जात आहेत ती प्लम केकला. या प्लम केकला मोठी मागणी असून नाशिकच्या सातपूर परिसरातील पफ अँड रोल्स या केक फॅक्टरीत प्लम केक बनवला जात आहे. 


यंदा ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. त्याशिवाय बाजारपेठा देखील फुलून गेल्या आहेत. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये गोडवा वाढवण्यासाठी प्लस केक नक्कीच बनवला जातो. हा केक दरवर्षी घरी बनवण्याचा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच यंदाच्या नाताळ सणामध्ये केकला मोठी मागणी असल्याने त्यातही प्लम केक ख्रिसमस सणात मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पफ अँड रोल्स या केक फॅक्टरीत ख्रिसमस निमित्ताने विविध केक तयार केले जात आहेत. शिवाय नाताळच्या सणात ख्रिस्ती बांधव प्लम केक हमखास बनवतात. यासाठी पफ अँड रोल्सच्या माध्यमातून केकची मेजवानी सुरु करण्यात आली आहे.  



विशेष म्हणजे या दिवसात केक व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते. दरम्यान ख्रिसमस केकचे विविध प्रकार मार्केटमध्ये पाहायला मिळतात. हा ख्रिसमस केक नेमका कसा बनवला जातो. तर साधा प्लम केक आणि रेड वाईन प्लम केक यामध्ये अगदी थोडाच फरक आहे. रेड वाईन वापरून बनवण्यात आलेला प्लम केक एक वेगळीच चव देऊन जातो. या प्लम केकमध्ये रेड वाईनमध्ये भिजवून ठेवण्यात आलेले ड्रायफ्रूट्स वापरण्यात येतात. त्यासाठी हे ड्रायफ्रूट्स अर्धा तास देखील भिजवता येतात आणि वर्षभर देखील भिजवून ठेवता येतात. केक बनवताना हेच ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे केकला रेड वाईनचा फ्लेवर येतो. जर रेड वाईन वापरायची नसेल तर आपण ऑरेंज ज्यूसमध्ये देखील ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवू शकतो. 


असा बनवला जातो प्लम केक 
सर्वप्रथम बटर, साखर, बदाम (कापलेले), व्हॅनिला इसेन्स, मिक्स सुका मेवा (मनुका, कँडीड साल आणि चेरी), मैदा, केक टिन अशा पद्धतीचे साहित्य आवश्यक असते. त्यानंतर फळे आणि बदाम 2 चमचे सर्व साहित्य पिठात मिसळून बाजूला ठेवा. त्यानंतर लोणी, साखर, व्हॅनिला इसेन्स एकत्र मिश्रण करा. मिश्रण केल्यानंतर पिठात एकत्र करा आणि त्यानंतर फ्रूट मिक्सरमध्ये एकत्र करा. आता हे मिश्रण एका बेकिंग टिनमध्ये ठेवा आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 40 मिनिटे बेक करा. यानंतर प्लम केक तयार होईल, मात्र केक थंड झाल्यावर सर्व्ह करा.