Nashik Chhagan Bhujbal : माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर बावनकुळेंवर असून शरद पवार (Sharad Pawar) आम्हाला गोर गरीबांचा जाणता राजा वाटतात. पण तुम्ही मोदींना विष्णूचा अवतार म्हणतात, आम्ही काय म्हणतो का? असा सवाल छगन भुजबळ यांनी भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांना प्रत्युत्तरात विचारला आहे. छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधी पक्षनेते पदावर आहे, असं बावनकुळे यांनी काल आरोप केला होता. यावर भुजबळांनी उत्तर दिले आहे.
सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून चागंलेच रान पेटले असून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर भाजपने आगपाखड करण्या सुरवात केली आहे. त्यातच आता शरद पवार याना जाणता राजा म्हणण्यावरून भुजबळांनी नाशिकमध्ये (Nashik) काल स्पष्टीकरण दिल्यानंतर बावनकुळेंनी भुजबळांचा समाचार घेतला होता. आता यावरून भुजबळांनी (Chhagan Bhujbal) बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वार पाहायला मिळत आहेत. भुजबळ म्हणाले, माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर बावनकुळेंवर असून अजित पवार अतिशय चांगेल काम करत आहे, लढत आहे. ते राज्य अध्यक्ष आहे, त्यामुळे बावनकुळेंनी न पटणारे, हास्यास्पद विधानं करू नये. बावनकुळे आता काय बोलतील, हे हास्यास्पद विधान असल्याचे भुजबळ म्हणाले.
दरम्यान काल भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतात, यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर आहे, ते मिळविण्यासाठी छगन भुजबळ शरद पवारांच्या नजरेत एक नंबर राहण्यासाठी भुजबळ शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असावेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या टीकेला प्रतित्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की मी शरद पवारांच्या नजरेत एकच नंबर आहे. बावनकुळेंनी नवीन वाद उकरुन काढू नये असे म्हटले आहे.
मी नेहमीच एक नंबर
भुजबळ पुढे म्हणाले कि, मी नेहमीच एक नंबर असून पद पाहिजे अशातला काही भाग नाही, अजित पवार अतिशय चांगेल काम करत आहे, लढत आहे. ते राज्य अध्यक्ष आहे, बावनकुळे यांनी न पटणारे, हास्यास्पद विधान करू नये. शरद पवार चांगले काम करतात. मी त्यांची शिवाजी महाराज यांच्या सोबत तुलना करतो, असं नाही. तुम्ही मोदींना विष्णूचा अवतार म्हणतात, आम्ही काय म्हणतो का? शरद पवार आम्हाला गोर गरीबांचा जाणता राजा वाटतात. या पदव्या जनतेतून आपोआप मिळतात लोक त्यांना जाणता राजा म्हणतात, मग विरोधकांना एवढा त्रास का होत आहे? माझा डोळा फक्त बावनकुळे यांच्यावर आहे. आम्ही काही राजकारणात नवीन नाही, कुणाच्या काही बोलण्याने आम्ही बहकणार नसल्याचे ते म्हणाले.