Chhagan Bhujbal : माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भुजबळ फार्म (Bhujbal Farm) या निवासस्थाना बाहेर पुन्हा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीसंदर्भात (Sarsvati Devi) केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सिडकोतील भुजबळ फार्म येथील पोलिस बंदोबस्तात (Police Security) वाढ करण्यात येऊन रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सरस्वती देवी संदर्भातही वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांविरोधात आंदोलन. त्यानंतर राज्यभरात देखील निषेध आंदोलने करण्यात आली. तर मुंबईच्या चेंबूर येथील ललित टेकचंदानी यांनी भुजबळांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. यावरून भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 


दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) पोलीस भुजबळ फार्म या भुजबळांच्या निवास स्थानी तैनात होते. आता यात रॅपिड ऍक्शन फोर्स देखील तैनात करण्यात आली असून  अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी इथे 24 तास पहारा देत आहेत. छगन भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वी सरस्वती मातेविषयीचे वादग्रस्त वक्तव्य केलेहोते. सरस्वतीचे फोटोऐवजी महापुरुषांचे फोटोची पूजा करावी अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात उद्रेक झाला. ठिकठिकाणी आंदोलना देखील झाली. भुजबळ फार्म या ठिकाणी देखील भाजपाच्या भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर महिला आघाडीने इथे येऊन सरस्वती मातेचे पूजन देखील केले. आणि आता भुजबळांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच सर्व परिस्थिती पाहता नाशिक पोलीस दल हे सतर्क झालेला आहे आणि इथला बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे. 


दरम्यान नाशिक पोलिसांचा ताफा भुजबळ निवासस्थानाबाहेर असून जे कोणी भुजबळ फॉर्ममध्ये कुठल्याही कामासाठी किंवा इतर कारणासाठी जात असतील त्यांची चौकशी देखील केली जाते. त्यामुळे जोपर्यंत हे वातावरण निवळत नाही. भुजबळ आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत नाही. कारण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे आंदोलन केलं त्यानंतर देखील भुजबळ यांनी निवेदन केलं होतं की आपण आपल्या मुद्द्यावर ठाम आहे त्यामुळे हा वाद कधीही शकतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोपर्यंत अशा स्वरूपाचा पोलीस बंदोबस्त इथे तैनात राहणार आहेत. त्यामुळे आता भुजबळ नेमकं काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. 


भुजबळांनी टेकचंदानीचे आरोप फेटाळले!
दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपतर्फे आंदोलन आकारण्यात येत आहेत. तर काल चेंबूर येथील एका व्यावसायिकाने छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून राजकारण पेटले  आहे. ललित श्याम टेकचंदानी असे या व्यापारी व्यावसायिकाचे नाव आहे. छगन भुजबळांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.