Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील आश्रमातील मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता भोंदुबाबाचा (Bhondubaba) प्रताप उघडकीस आला आहे. नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील एका भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 


नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या (Molestation) घटनांत वाढ होत असून आज विनयभंग, अत्याचार सातत्याने समोर येत आहेत. अशातच नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलं आहे. विष्णु काशिनाथ वारूंगसे उर्फ देवबाबा असे या संशयित भोंदूबाबाचे नाव असून त्यासोबत सुनिता विष्णू वारूगसे, उमेश विष्णू वारूंगसे, वैशाली विष्णू वारूगसे अशी इतर संशयितांची नावे आहेत. याबाबतची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिक शहरातील आश्रमातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता नाशिकरोडच्या एका भोंदूबाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. संबंधित पीडित महिलेवर गेल्या तीन वर्षांपासून या अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. अत्याचाराच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ माजली आहे. अशा पद्धतीने शहरात भोंदूबाबांच्या प्रस्थान आहे, अनेक नागरिक या भूलथापांना बळी पडत असून यापूर्वी देखील येवला तालुक्यात मुलीचे लग्न जमत नसल्याचे सांगून भोंदूबाबाकडे गेली होती. आईसह मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. दरम्यान या घटनेनंतर भोंदुबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.


नेमके प्रकरण काय?


दरम्यान पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी संगनमत करून फिर्यादीस संशयित देवबाबाने त्याच्या राहत्या घरी व इतर ठिकाणी फिर्यादीच्या संमतीविना अत्याचार केलेय त्याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले, फिर्यादीस घर देण्याचे आमीष देऊन पाच लाख रूपये देखील उकळले. पैसे परत मागितल्यावर धमकावले. ब्लॅकमेल करून फिर्यादीची फसवणूक करून शारीरिक व मानसिक अन्याय अत्याचार केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तीन वर्षे केला अत्याचार


नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या भोंदूबाबाने एप्रिल 2018 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत पीडितेवर अत्याचार केल्याचे नंदू तक्रारीवरून निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर पीडित महिलेला घर घेण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये उकळले होते. हे मागितले, मात्र धमकी व दैवी शक्ती असल्याचे सांगून वेळावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.