Nashik News : नाशिककरांची (Nashik) नववर्षाची सुरुवात बोचऱ्या थंडीने (Cold) झाली असून थंडीचा जोर वाढल्याने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून काकडी, गवार, शेवगा यांचे भाव शंभरीपार गेले असून ईतर भाज्यांचे दरही 50 ते 60 रुपयांच्या दारात जाऊन पोहोचल्याच बघायला मिळत असून आवक कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचं विक्रेते सांगत आहेत. 


नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवाका कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र या थंडीत देखील आपल्या मालाला चांगला भाव मिळावा, या आशेने पहाटे पहाटे कुडकुडत शेतकरी बाजार समितीमध्ये दाखल होत असून विक्रेते देखील आपली दुकाने थाटत आहेत. याचा थेट परिणाम भाजीपाला (Vegetable) दरावर होत असून भाजीपाल्याचे दर वाढत्या थंडीत कडाडले आहेत. शेवगा या भाज्यांचे भाव हे चांगलेच कडाडले आहेत. शंभरच्यावर जाऊन पोहोचले असून इतर भाज्यांचे भाव देखील जवळपास 60 ते 70 रुपये किलो एवढ्या दरात विक्री होते आहे. 



नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली असून निफाडचा (Niphad) पारा हा सात अंशावर येऊन पोहोचला आहे. मात्र या थंडीत देखील शेतकरी आपला माल एक घेऊन नाशिक बाजार समिती मार्केट यार्डमध्ये सकाळी सकाळी दाखल होत आहेत. कुठेतरी शेतमालाला भाव मिळावा, त्यामुळे पहाटेपासूनच बाजारामध्ये अशाप्रकारे येऊन पोहोचत आहेत. खरंतर काही दिवसांपासून गवार, शेवगा या भाज्यांचे भाव हे चांगलेच कडाडले आहेत. शंभरच्यावर जाऊन पोहोचले असून इतर भाज्यांचे भाव देखील जवळपास 60 ते 70 रुपये किलो एवढ्या दरात विक्री होते आहे. यामागे आवक कमी येणे, आवक कमी जाणे या कारणामुळे भाजीआपाला दर वाढले असून सध्या शेतकऱ्याला पीक तोडायला परवडत नाही, जास्त महागाई भरपूर असून गवार भेंडी याला महागाई जास्त आहे काकडीचे भाव थोडे कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. एकीकडे हे भाव जरी वाढल्याचे दिसत असले तरी ग्राहक देखील भाव करताना घासाघीस करत असून शेतकऱ्याला मात्र परवडत नसल्याचे चित्र आहे.वाहतूक खर्च, मजुरांचा खर्च असेल हे सर्व बघता हा मालाला मिळणारा भाव आहे, त्यामध्ये शेतकरी देखील समाधानी नसल्याचे जाणवते आहे. 


नाशिकच्या थंडीतही वाढ 
दरम्यान मागील आठवड्यात नाशिक शहराचे किमान तापमान 15 अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तपमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे शनिवारीपासून तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून 10 अंशावर पारा येऊन ठेपल्याने सकाळपासून हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासूनच पारा घसरत असल्याने नाशिककरांनी स्वेटर परिधान करण्यास सुरवात केली आहे. नाशिककरांना हुडहुही भरू लागल्यामुळे जिम क्रीडांगणे, जॉगिंग पार्क, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.