MVA Mahamorcha : राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.


महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महागाई, बेरोजगारी, पळविलेले उद्योगधंदे, महापुरुषांचा होत असलेला अवमान असे विविध प्रश्न हाती घेत महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात नाशिकहून तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात छगन भुजबळ यांनी अग्रभागी सहभागी होत सरकार विरोधात हल्लाबोल केला. 


छगन भुजबळ यांनी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नागपाडा येथे मोर्चा स्थळी नियोजनाची पाहणी करत सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मोर्चात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, राज्यात रोजगार देणारे उद्योग पळविले जात आहे. सीमा प्रश्नावर नको ते प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला जात आहे. राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.


दरम्यान महाविकास महामोर्चात नाशिकहून महापुरुषांचे चित्ररथ नेण्यात आले होते. या मोर्चाच्या अग्रभागी महापुरुषांचे चित्ररथ ठेवण्यात आले होते. या चित्ररथांचे सर्व नियोजन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केले. महामोर्चाच्या अग्रभागी असलेल्या या चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी मोर्चेकऱ्यानी महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल करत महापुरुषांच्या नावाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने होणाऱ्या हल्लाबोल मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील शहरातले हजारो कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली, या भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला छळवून सोडलेले आहे, नको ते वक्तव्य सरकारमधल्या राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे लोक करत आहेत. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना अशाप्रकारे ठिकाणी स्त्रियांचा अनादर केला असल्याचे राज्यपालांची हकालपट्टी करा अशी मोर्चाद्वारे करण्यात आली. 


महामोर्चात महापुरुषांचे चित्ररथ...  
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर व जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते महामोर्चात सहभागी झाले. नाशिक शहरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई मोर्चात सहभागी झाले. आज सकाळी राष्ट्रवादी भवनजवळ सर्व कार्यकर्ते जमल्यानंतर या ठिकाणाहून मुंबईकडे कूच करण्यात आली. यावेळी नाशिकहून महापुरुषांचे चित्ररथ नेण्यात आले, जे कि महामोर्चात अग्रभागी ठेवण्यात आले होते.