Nashik ZP CEO : आगामी निवडणुका (Election) लक्षात घेता शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 44 आयएएस आधिकाऱ्यांच्या (IAS Officer Transferd) तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील अनेक विभागाचा कारभार बदलणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड (Leena Bansod) यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Nashik ZP CEO) लीना बनसोड यांच्या यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आयएएस अशीमा मित्तल यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.  या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या. दरम्यान नाशिकच्या प्रांताधिकारी वर्षा मीना यांचीही जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. 


दरम्यान 14 फेब्रुवारी 2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या संकटाने प्रवेश केला. या दरम्यान सीईओं लीना बनसोड यांनी आरोग्य विभागाला हाताशी धरून कोरोनाशी सामना केला. शिवाय लीना बनसोड यांनी जिल्हाभरात लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करत लोकांना लसीकरण करण्यासाठी आश्वस्त केले. 


आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे सरकारने गुरूवार रात्री अवघ्या तीन महिन्यात राज्यातील 44 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत प्रशासकीय पातळीवरील भाकरी फिरवली आहे यामध्ये आयुक्त जिल्हाधिकारी सचिव प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव यांचा बदलांचा समावेश आहे. दरम्यान नाशिकमधून जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांच्यासह नाशिक प्रांताधिकारी वर्षा मीना यांची देखील बदली करण्यात आली आहे. लीना बनसोड यांची ठाणे येथील आदिवासी विकास विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली तर डहाणू येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांची नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे. 


कोण आहेत आशिमा मित्तल?
भाप्रसे अशीमा मित्तल यांची नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशीमा मित्तल या मूळच्या  राजस्थानातील जयपूर येथील आहेत. आशिमा मित्तल यांचे शिक्षण अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून त्यांनी या क्षेत्रात नोकरी देखील केली आहे. त्यानंतर नोकरीत असताना त्यांनी तीन वेळा यूपीएसी परीक्षा दिली. मित्तल यांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, दुसऱ्या प्रयत्नात मित्तल यांनी 328 रँक मिळवली.  तर तिसऱ्या प्रयत्नात 12 रँक मिळवत गवसणी घातली होती.