Nashik Amit Thackeray : नाशिकच्या (Nashik) टोल तोडफोड प्रकरणावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोल नाक्यावरील तोडफोड मुद्दामहून घडवून आणले नाही, तर अनाकलनीयरित्या घडले. तेथील कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा त्याचबरोबर राज्यातील इतरही टोलवर अशाच पद्धतीने कामकाज केले जात असून सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत हे थांबलं पाहिजे, असे आवाहन देखील अमित ठाकरे यांनी केले. 


आज अमित ठाकरे हे खास नाशिकच्या (Nashik MNS) मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. सिन्नर (Sinnar) येथील टोल नाका (Toll Plaza) तोडफोड प्रकरणामुळे मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज स्वतः अमित ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अमित ठाकरे यावेळी म्हणाले की, टोल नाक्याची तोडफोड प्रकरण हे काय मुद्दामहून घडवून आणले नाही, अनाकलनीय घडलं. त्यांनतर आज प्रेमापोटी मी भेटायला आलो. त्यांचे अभिनंदन करायला आलो. अशा टोलबद्दल लोकांमध्ये संदेश द्यायला पाहिजे. अनेक टोळीवर बाऊन्सर ठेऊन दादागिरी केली जात आहे. त्यामुळे सामान्य लोकांना किती त्रास सहन करावा लागत असल्याचे ठाकरे म्हणाले. 


दरम्यान, राज्यभरातील अनेक टोलबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. टोलच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. मुंबईजवळील (Mumbai) ठाणे, वाशी टोलनाक्यावर एक तास थांबावे लागतं. सामान्य नागरिक 8 ते 10 टॅक्स वेगळे भरतात. नाशिक मुंबई मार्गावरून येताना व्हिडीओ काढायला विसरलो. प्रचंड ट्रफिक असून खड्डे देखील आहेत. मात्र आज नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला आलो असून या प्रकरणात शहराध्यक्ष यांना जामीन मिळाला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा आहे आणि राहील. त्याचबरोबर या प्रकरणानंतर भाजपने मनसेवर टीका केली. यावर ते म्हणाले की, भाजपच्या टिकेला मी भीक घालत नाही. हा विचित्र प्रकार आहे, हे थांबले पाहिजे, असे सांगत एकदा राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवा, संधी द्या, पुढच्या वर्षी एकदा बघा, असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले. 


ते पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हे आंदोलन झालं आहे. कुणीतरी माझ्यासाठी अंगावर केसेस घेतल्या आहेत. याचमुळे मी त्यांना मुंबईत बोलवणार होतो. मात्र मी नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज नाशिकला येऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या सर्वांची भेट घेत असून शहराध्यक्षांना जामीन मिळाला आहे. तर एक ओला चालक येऊन भेटले, ते म्हणाले, तुमच्यामुळे मला शिर्डीला जायला मिळाले, त्यामुळे 490  रुपये वाचले, मी म्हटलं कास तर ते म्हणाले की मी सिन्नर टोलनाक्यावरून गेलो, असं उदाहरण देखील अमित ठाकरे यांनी दिले. तर यापुढेही अशीच ऊर्जा राहील का? या प्रश्नावर मिश्कीलपणे उत्तर देत, मग असेच टोलनाके फोडत बसायचं का? ऊर्जा आहे तशीच राहील, असेही अमित ठाकरे म्हणाले. 


समृद्धी महामार्गावर नक्की काय घडलं?


अमित ठाकरे सिन्नर ते नाशिक असा प्रवास मनसे पक्षाच्या नावाने नोंद असलेल्या गाडीतून करत होते. समृद्धी महामार्गावर रात्री 9.21 वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत, हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. पण जसं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. 


ईतर संबंधित बातम्या : 


Raj Thackeray Full PC : अमित ठाकरे टोल फोडत चालला नाही, राज ठाकरेंचा पहिला हल्ला गडकरींवर