Sinnar Toll Issue : समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway) नाशिकच्या गोंदे टोल नाका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या 12 ते 15 अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या 8 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक (MNS Leaders Arrested) केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून ईतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.
समृद्धी महामार्गावरील नाशिकच्या (Nashik) गोंदे टोल नाक्यावर (Gonde Toll Plaza) राज ठाकरेंचे सुपुत्र तथा मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचे (Amit Thackeray) वाहन अडवल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्री मनसैनिकांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने टोलनाका क्रमांक दोनवरील सात बूथची तोडफोड करत मोठ्या प्रमाणावर नासधूस केली होती. यात कॅबिन, कॉम्प्युटर साहित्य आणि ईतर उपकरणांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले होते, याप्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनूसार मनसेच्या 12 ते 15 अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या 8 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून इतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या (Uttar Maharashtra) दौऱ्यावर असतांनाच दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान हे टोल नाके ज्यांच्या अखत्यारीत येतात, त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसेंनी (Dada Bhuse) या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देतांना कायदा सगळ्यांसाठी एकच आहे असं म्हंटल आहे. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, 'मी माहिती घेतली, अमित ठाकरे त्या मार्गावरून जात होते. कदाचित त्यांच्या फास्टगची मुदत ऑटो लॅप्स झाली असेल, म्हणून प्रवेश देत नव्हते. त्या प्रक्रियेला काही वेळ जातो. या लेनवरील पोल मॅन्युअली ओपन होत नाही. यातून काहीतरी गैरसमज झाला असेल.. कायदा मी असेल किंवा कोणीही सगळ्यांसाठी एकच आहे.
समृद्धी महामार्गावर नक्की काय घडलं?
अमित ठाकरे ज्या गाडीमध्ये बसले होते त्या गाडीची नोंद मनसे पक्षाच्या नावाने आहे. समृद्धी महामार्गावर रात्री 9.21 वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. पण जसं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. सध्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले आहेत. पण अजून कोणतीही कायदेशीर तक्रार टोल प्रशासनाकडून पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :