Chhagan Bhujbal : ललित टेकचंदानी याने यापूर्वी देखील आमच्या नावावर अनेक केसेस केल्या आहेत. काही केसेस सुटल्या आहेत, काही कसला तोंड देत आहोत. गेल्या दहा वर्षांपासून टेकचंदानी आणि माझ्यात वैर असून नाव खराब करण्यासाठी कुभांड रचल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. शिवाय टेकचंदानी यांचा अनेक वर्षांपूर्वी नंबर डिलिट केला आहे. त्यामुळे आमचा संपर्कच नाही. त्यामुळे टेकचंदानी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे मत छगन भुजबळांनी व्यक्त केले आहे. 


दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपतर्फे आंदोलन आकारण्यात येत आहेत. तर काल चेंबूर येथील एका व्यावसायिकाने छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून राजकारण पेटले  आहे. ललित श्याम टेकचंदानी असे या व्यापारी व्यावसायिकाचे नाव आहे. छगन भुजबळांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप टेकचंदनी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 


छगन भुजबळ यावेळी म्हणाले, १९९५ ते २०१४ त्यानंतर २०१९ पर्यंत टेकचंदानी यांनी आमच्यावर विविध केसेस केल्या आहेत. यातील काही केसेस सुटल्या आहेत तर काही केसेस अद्यापही सुरु आहेत. मात्र तेव्हापासून या टेकचंदानीचे नाव पत्ता सोडून दिला होता. नंबर डिलीट केला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असल्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने व्हाटसप च्या माध्यमातून मॅसेजेस येत आहेत. त्यामुळे अनेकजण कॉल करूनही बोलत आहेत. दरम्यानच्या काळात सरस्वती प्रकरण आल्यापासून अनेक मॅसेज यायला सुरवात झाली. कुणी अनोळखी माणूस सातत्याने मॅसेज करत असल्याचे समजले. त्यामुळे हा माणूस कोण आहे? हा का सतत त्रास देत आहे. याबाबत विचार करत होतो. मात्र येणं सुरूच होत. शेवटी सहकाऱ्याला सांगून याबाबत माहिती काढायला लावली. 


दरम्यान सहकाऱ्याने त्याच क्षणी त्याला कॉल केला, मात्र त्याने तो उचलला नाही. हि गोष्ट पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीला माहिती झाल्यानंतर तिने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तयावेळी टेकचंदानी याने 'मला बोलायचं अधिकार आहे, मी बोलू शकतो. त्यावर कारतकर्तीने तुमचं म्हणणं काय आहे, भुजबळांना त्रास का देत आहेत? अशी विचारणा केली. त्यावर काहीही मॅसेज न करता टेकचंदानी यांनी मला बोलायचा अधिकार असल्याचे सांगितले. पुढे शेवटी त्याला म्हणालो कि, आम्ही भेटायला येतो... पण ते झालं नाही. असेही भुजबळांनी कथन केले. या व्यतिरिक्त काहीही झालेले नाही. कोणीही धमकीचे मॅसेज अथवा कॉल केलेले नाहीत. टेकचंदानी यांचे आरोप चुकीचे असल्याचे भुजबळांनी सांगितले. नाव खराब करण्याच्या हेतून हे कुभांड रचले असल्याचे भुजबळ म्हणाले. 


भुजबळांविरुद्ध गुन्हा 
छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसात फिर्याद दिली आहे. जीवे मारण्याची धमकी देणारा अज्ञात फोन आला होता, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. चेंबूर येथील गृहस्थ सामाजिक कार्यकर्त्या आणि व्यापारी ललित श्याम टेकचंदानी हि तक्रार केली आहे. भुजबळ यांना विडिओ पाठविल्यानंतर धमकी देणारे मॅसेज आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तर भुजबळ म्हणाले गुन्हा दाखल झाल्याबाबत कल्पना नव्हती. तसेच टेकचंदानी यांना कोणताही मॅसेज केला नाही..