नाशिक : एकीकडे राज्यातील बहुतांश भागात पाऊस बरसत (Maharashtra Rain) असताना दुसरीकडे मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) मात्र अद्यापही कोरडाच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आदी तालुक्यातील धरणे तहानलेलीच असून शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाळ्याचे (Rainy Season) दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याचे चित्र आहे. 


नाशिक जिल्ह्याचा (Nashik Dsitrict) विचार केला तर आजही एकही थेंब पावसाचा झाला नसून त्यामुळे आजचा दिवसही कोरडाच गेल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प असून अद्यापही अनेक धरणांत पन्नास टक्केसुद्धा जलसाठा नाही. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) भागात पाऊस होत असल्याने गंगापूर धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. मात्र अनेक प्रकल्पात अद्यापही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मोठे धरणे प्रमुख मोठ्या धरणांमध्ये गंगापूर धरण (Gangapur Dam) आजमितीस 90 टक्के भरले आहे. करंजवण धरण 56 टक्के, दारणा धरण 93 टक्के तर पाण्याचा विसर्ग 550 क्यूसेसने सुरु आहे. मुकणे धरण 77 टक्के, चणकापुर धरण 75 टक्के तर पाण्याचा विसर्ग 471 क्युसेसने सुरु, गिरणा धरणं 34 टक्केच आहे. 


नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंतची पावसाची आकडेवारी पाहिली असता नाशिक जिल्ह्यात 603.5 मि.मी.सरासरी पाऊस असतो. मात्र जून ते आजतागायत 368.9 मि.मी.पाऊस झाला आहे. सरासरी 61.1 टक्के एवढा पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतीचा विचार केला तर खरीपाच्या पेरणीचे एकूण क्षेत्र - 641771.88 हेक्टर असून यंदा लागवड झालेले एकूण क्षेत्र 587751.5 एवढे आहे, म्हणजे एकूण 91.58 टक्के  इतके आहे. यात कांदा लागवडीचे एकूण क्षेत्र 3137.60 हेक्टर, तर झालेली कांदा लागवड 662.00 हेक्टर इतकी आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती आहे.


जळगाव, नंदुरबार जिल्ह्याची स्थिती 


तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आतापर्यंत 320 मिमी म्हणजेच सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण 7 लाख 66000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यातील 5 लाख 60 हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र पीक परिस्थिती मध्यम स्वरूपाची आहे. मात्र पावसाची आवश्यकता आहे. जिह्यात कोणत्याही भागात अद्याप दुष्काळ सदृश्य पीक परिस्थिती नाही. नंदुरबार जिल्ह्याचा आढावा घेतला असता जिल्ह्यात एकूण 5 मध्यम प्रकल्प आहेत. नंदुरबार (Nandurbar) वीरचक शिवण मध्यम प्रकल्प 30 टक्के, मागील वर्षाचा पाणीसाठा 80 टक्के, शहादा दरा मध्यम प्रकल्प आताचा 100 टक्के पाणीसाठा, मागील वर्षाचा पाणीसाठा 85 टक्के, नागण मध्यम प्रकल्प 66 टक्के, तर मागील वर्षाचा पाणीसाठा 43 टक्के, कोरडी मध्यम प्रकल्प 26 टक्के, मागील वर्षाचा पाणीसाठा 27 टक्के देहली मध्यम प्रकल्प 100 टक्के असा जलसाठा आहे. तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांपैकी ढोंगलघु प्रकल्प, अमरावती नाला लघु प्रकल्प, चोपडेलघु प्रकल्प, घोटानेलघु प्रकल्प, सुसर लघु प्रकल्प या 5 मध्यम प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.


पावसाची सरासरी 50 टक्के मागील वर्षी पडलेला पाऊस त्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस यातील तुलनात्मक फरक 30 टक्के आहे. खरिप पिकांची सध्याची परिस्थिती पाऊस नसल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. एकूण पेरणी क्षेत्र दोन लाख 56 हजार हेक्टर लागवड झालेली क्षेत्र सरासरी एक लाख 80 हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून कापूस, मिरची, पपई, केळी, असून त्या पिकाची सद्यस्थिती पाऊस नसल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे नंदुरबार, शहादा, धडगाव तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे.


धुळे, अहमदनगर जिल्ह्याची स्थिती 


धुळे जिल्ह्यातील (Dhule) मध्यम आणि लघु प्रकल्पात सध्या फक्त 40 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात एकही टँकर नाही, मात्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर 60 गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 54 टक्के पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात 98 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यात शेतकऱ्यांवर तिसऱ्या पेरणीचे संकट आहे, जिल्ह्यात कापूस, मका, हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात. कापूस हे प्रमुख पीक आहे. शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर (Ahmednagar) जि्ह्यामधील भंडारदरा 97 टक्के, निळवंडे 83 टक्के, मुळा 77 टक्के, आढळा 83 टक्के, भोजापुर 63 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात 59 गावे आणि 348 वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली. जिल्ह्यात एकूण 55 सरकारी आणि खासगी टँकर सुरू आहे. खरिपाच्या पेरण्या 98 टक्के झाल्या आहेत. ज्याची आकडेवारी 5 लाख 70 हजार 357 हेक्टरवर पेरण्या झाल्या. दक्षिण नगर जिल्ह्यात पारनेर, कर्जत - जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत 39 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असून गेल्यावर्षी याच काळात 73 टक्के पाऊस झाला होता.


संबंधित बातमी : 


Nashik Rain : "या अल्लाह बारीश अताह फरमा"; मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी विशेष दुवा पठण