Aditya Thackeray : शिवसेनेतून 40 आमदार गेले, सरकार स्थापन झाल, यात गद्दारांना काय मिळाल? तर दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 50 थर लावले, आणि आता मलई खाणार? गद्दारांना मिळाली का मलई? त्यांना मिळाला बाबाजी का ठुल्लू अशा कडक शब्दांत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांचा पाणउतारा केला आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे. सध्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू असून आज ते जळगाव मध्ये आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, दोन महिन्यांत राज्यात काय झाले हे तुम्हाला मान्य आहे का? 50 खोके बरोबर जाण सोपं आहे, पक्षा सोबत राहणं महत्वाचे आहे. सध्या महत्वाचा काळ असून राज्यभर शिवसंवाद यात्रेला प्रेम मिळत आहे, पुढचा काळ शिवसेनाचा असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले, विदर्भात अतिवृष्टी झाली आणि आपण हार तुरे स्वीकारने योग्य नाही, काल दहीहंडी होती तात्पुरते मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आम्ही 50 थर लावले, 50 थर होते की आणखी काय? तसेच ठाकरे परिवार आणि शिवसेना ला एकट पडण्याचा प्रत्यन सुरू आहे, पण ते शक्य नसल्याचा निर्वाणीचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला
आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी एकनिष्ठ
आदित्य ठाकरे यांची पाचोरा येथे शिवसंवाद यात्रा होती. यावेळी बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य यांची सभा किशोर पाटील यांना त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी घरातूनच आव्हान दिले. वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून आदित्य यांचे पाचोरात स्वागत करण्यात आले. वैशाली सूर्यवंशी यांना आता देण्यासाठी तिकिट नाही, पण उद्धव ठाकरे जेव्हा सांगतील तेव्हा एक दिवस पूर्ववेळ घालवेल, असे आश्वासन यावेळी शिवसेना पदाधिकारी वैशाली सूर्यवंशी यांना दिले.
हे सरकार कोसळणारच!
आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत हे बेकायदेशीर सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
हे सर्व 40 आमदार एक दोन लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षे पोटी गेले आहेत, मात्र हिंदुत्वासाठी गेले नाही. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला तेव्हा बार नाचत असल्यासारखे नाचत होते. ही गद्दारी शिवसेना सोबत नाही, माणुसकी सोबत आहे. मी पुन्हा पुन्हा बोलत नाही पण लोकांना कळायला पाहिजे म्हणून त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार म्हणजे बोलणारच असे परखडपणे आदित्य ठाकरेंनी सुनावले.
साहेब आजारी तेव्हा हे षडयंत्र रचत होते...!
दरम्यान दिवाळीच्या काळात वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आले होते. यावेळी त्या सर्वांनी जेवण केले. उध्दव साहेबांचे ऑपरेशन करायचे होते, मला जागतिक परिषदे साठी जायचे होते. उध्दव साहेब यांनी जायला सांगितले. साहेबांचे एक ऑपरेशन झाले दुसरे तत्काळ करावे लागले. यावेळी हे गद्दार साहेबांना मदत करण्या ऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे जे उध्दव साहेबांचे नाही झाले ते महाराष्ट्र आणि तुमचे काय होणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आमदारकीचा राजीनामा द्या...!
उद्धव साहेबांची तब्येत बरी नसल्याने त्यांना सातत्याने रुग्णालयात न्यावे लागत होते. मुख्यमंत्र्यांचे कुटुंब खचले तर राज्य काय करणार? असेही वाटत होतं. मात्र त्याही वेळी उध्दव साहेब राज्याचा आढावा घेत होते. तर दुसरीकडे हे गद्दार साहेबांना मदत करण्याऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. आता सद्यस्थितीत ज्यांना मंत्रीपद दिले आहे. ते आमच्या बरोबर होते. आपण चांगले खाते दिले आता त्यांना लायकी दाखविली. आपण लायकी पेक्षा जास्त दिले हीच आपली चूक आहे. मात्र गद्दार बनून राहायचे असेल तर जा, पण आधी आमदारकीचा राजीनामा द्या आणि होऊन जाऊद्या असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.