Nashik Jindal Fire : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्ममध्ये एक जानेवारी रोजी झालेला भीषण आग दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून आकडेवारी लपवून ठेवत आहे. मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी भेट देऊन गेले असताना देखील कंपनी व्यवस्थापन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी व मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


नाशिकच्या (Nashik) इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोटाची घटना घडली. यानंतर भीषण आग लागून दोन कामगारांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले. मात्र कंपनी प्रशासन कामगाराचा आकडा लपवत असल्याचे सांगून अद्यापही अनेक कामगार बेपत्ता असल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या जिंदाल कंपनी व्यवस्थापनाची कसून चौकशी करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष संपतराव काळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जिंदाल कंपनीतील (Jindal Company fire) काम करणारे सातशेहून अधिक कामगार घोटी (Ghoti) शहरात राहतात. त्यापैकी 83 कामगारांशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. त्यामुळे या कामगारांचा शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी (collector) गंगाथरण डी यांच्याकडे केली आहे. 


नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गंगाथरण डी यांची भेट घेत कंपनी प्रशासन कामगाराची माहिती लपवत असल्याची तक्रार केली. यावेळी काशिनाथ मेंगाळ म्हणाले कि, कंपनी तीन शिफ्ट मध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये किमान 2 हजारहून अधिक कामगार कार्यरत असतात. यातील कंपनीत काम करणारे असंख्य कामगार हे घोटी शहरात वास्तव्य करतात. त्यापैकी 100 कामगार हे घटना घडली त्या दिवशी कंपनीत कामावर गेले होते. या कामगारांपैकी 17 जणांशी संपर्क झाला असून 83 कामगारांशी कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला आहे. हे कामगार बेपत्ता झाल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. बेपत्ता कामगारांचा शोध घ्यावा, मृत कामगारांच्या वारसांना कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांचे मदत मिळवून द्यावी, अशा मागणी यावेळी करण्यात आल्या. 


कंपनीची  कसून चौकशी करावी.. 
दरम्यान दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे दिले आहे. यामुळे या शिष्टमंडळाने पारधी यांची भेट घेतली. कंपनी व्यवस्थापन जाणून मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाची कसून चौकशी करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  शिवाय मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण दुर्घटनेनंतर नाशिकमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कंपन्यांच्या फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. एमआयडीसीतील 4000 कंपन्यांपैकी 30 टक्के कंपन्यांनी फायर ऑडिट केलेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कंपन्यांना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही अशी माहिती समजते आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Jindal Fire: नेमकं 'त्या' दिवशी किती कर्मचारी हजर होते? कंपनी प्रशासनाकडून महत्वाची माहिती