Nashik Budhha Paurnima : बुद्ध पौर्णिमेनिमीत्त (Budhha Paurnima) पाच फूट उंचीच्या फायबर मेटलपासून बनविलेल्या शंभर बुद्ध मूर्तीची (Budhha Murti), शंभर भव्य रथांतून मिरवणूक काढण्यात आली. या शंभर बुद्ध मूर्ती नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शंभर गावांना दान करण्यात आल्या. नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून हा बुद्ध मूर्ती प्रदान सोहळा पार पाडण्यात आला.
दोन दिवसांवर बुद्ध पौर्णिमा आली असून शहरात उत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून नाशिक (Nashik) शहरातून हजारो बांधवांसह बुद्धमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शंभर गावांमधील 500 श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभाग झाले होते. सम्राट अशोक जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त 23 एप्रिल ते दोन मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबीर घेण्यात आले. या शिबीरांत शंभर गावातील प्रत्येकी पाच उपासक श्रामनेर झाल्यास सुमारे 500 श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील शंभर गावांना शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या. प्रत्येकी साडेपाच फूट उंचीच्या तसेच फायबर मेटल पासून एकाच साच्यात तयार करण्यात आलेल्या या बुद्धमूर्तींना गावागावांत दान करण्यात आले. रंगबिरंगी फुलांनी व निळा झेंड्यांनी सजवलेल्या शंभर रथांमधून या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर आयोजित महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन करण्यात आले. तर सायंकाळी सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
शंभर गावांत श्रामणेर शिबीर
दरम्यान भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बीएमए ग्रुपच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये श्रामणेर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात प्रत्येक गावातील पाच उपासकांनी श्रामणेर शिबीरात सहभाग घेतला. त्यानुसार यंदा जिल्ह्यातून एकूण पाचशेहून अधिक उपासक श्रामणेर झाले. याच शंभर गावांना बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या. या साडे पाच फूट उंचीच्या मूर्ती त्या प्रत्येक गावातील बुद्ध विहारात दान करण्यात आल्या. तत्पूर्वी नाशिक शहरातील विविध भागातील भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली.