Nashik MNS : नाशिक (Nashik) महापालिका निवडणूक होतील तेव्हा होतील मात्र प्रत्येक कार्यकर्त्याने तयारीत रहावे, आगामी महापालिका निवडणुकांत मनसेचा गड राखणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असे निर्देश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिक (Nashik) मनसे पदाधिकाऱ्यांना (MNS Leaders) दिले आहेत. त्यामुळे आगामी नाशिक मनपा निवडणुकात (Nashik NMC Election) मनसे देखील संपूर्ण तयारीने उतरणार असल्याचे दिसते आहे. 


नाशिकसह (Nashik) राज्यातील मनपा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अद्याप निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झाले नसले तरी पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी चार दिवसांचा नाशिक दौरा केला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचाला आहे. त्यानुसार नाशिक येथून काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चांसह अमित ठाकरे यांचा दौरा, त्याचबरोबर आगामी नाशिक महापालिका निवडणुकांसंदर्भात विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. 


यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे. नाशिकच्या प्रत्येक प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.  तसेच निवडणूक मतदान यादी निहाय शहरात 700 राजदूत नियुक्त करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच आपण पुढील महिन्यात नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. नाशिक हा मनसेचा गड राहिला असून तो परत मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी नाशिकची जबाबदारी मन विषयाचे अध्यक्ष अमित ठाकरेंवर सोपवण्यात आली आहे. 


गेल्या आठवड्यात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नाशिकचा चार दिवसांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मनविसे अधिक भक्कम करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये शाखा सुरू करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपल्या नंतर राज ठाकरेंनी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलून घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत राज ठाकरे यांनी नाशिक मधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत राज्य राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना करत निवडणूक होतील तेव्हा होतील. आपण आतापासूनच तयारीला लागा. सध्या सुरू असलेल्या घोळाकडे दुर्लक्ष करा आणि निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना केल्या आहेत. 


राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर?
दरम्यान गेल्या आठवड्यात अमित यांनी नाशिकचा चार दिवसांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मनविसे अधिक भक्कम करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये शाखा सुरू करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपल्या नंतर राज ठाकरेंनी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलून घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले पुढील महिन्यात नाशिकमध्ये येण्याचे संकेत असून त्यावेळी अधिक सविस्तर आढावा घेता येईल. मात्र तोपर्यंत नाशिक शहर पिंजून काढा, यंदाच्या निवडणुकांत मनसेचा झेंडा मनपावर फडकविणे हेच ध्येय ठेवून काम करा असे निर्देश राज ठाकरे यांनी दिले आहेत.