Nashik News : त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील जंगल परिसर असलेला हरसूल (Harsul), पेठ, सुरगाणा तालुक्यातील काही भागातून सर्रास खैर लाकडाची तस्करी केली जाते. काही दिवसांपूर्वी पेठ वांगणी शिवारात खैर लाकडाची तस्करी रोखली असताना आता हरसूल वनपरिक्षेत्रातून खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
नाशिकच्या (Nashik) पश्चिम पट्ट्यातील हरसूल, वाघेरा पेठ-सुरगाणा तालुक्यातील काही भाग आदी परिसर जंगलाने व्याप्त असल्याने लाकूड तस्करीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान वन पथक धडक कारवाई करत असल्याने काही अंशी गायब झालेली खैर लाकूड तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार साताराचा खैराची तस्करी गुजरात सेमी जवळील जंगलात रोखण्यात यश आले आहे.
दरम्यान जप्त केलेले वाहनातून खैराचे 41 नग वन कर्मचाऱ्यांनी हस्तगत केले आहेत हरसुल वनपरिक्षेत्रातील ओझरखेड वनी परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून एक तवेरा मोटारीतून काही संशयित व्यक्ती खैर लाकडे अवैधरीत्या वाहतूक करणार असल्याची माहिती वनपथकाला मिळाली होती. यानुसार हरसुल वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे यांनी पथक तयार करत जंगलाच्या परिसरातून जाणारे रस्त्यावर पळत ठेवली. मात्र संशयितांना कुणकुण लागताच वाट बदलली.
दरम्यान वनाधिकारी कर्मचारी देखील दुसऱ्या वाटेने जात ओझरखेड वनपरिमंडळाच्या हद्दीत व वन पथकाने वाहनाद्वारे त्या मोटारीचा पाठलाग सुरू ठेवला. यावेळी सापळा कारवाई पथकाने खैराच्या लाकडांनी भरलेली गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाची पासिंग असलेली कार ताब्यात घेत हरसुल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणली. संशयित मोटर चालक व चालकासह अज्ञाताविरुद्ध हरसुल वनपरिक्षेत्र कार्यालयात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्करांकडून जंगलात साठवून ठेवलेला खैराच्या तासलेल्या 41 लाकडांचा साठा अवैधरीत्या वाहून नेला जात होता. या साठ्याची किंमत साडेबारा हजार रुपये इतकी असून तस्करांकडून वाहन चौकशी करता ताब्यात घेण्यात आले आहे.