Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील महत्वाच्या पोलीस स्टेशनपैकी एक असलेल्या म्हसरूळ पोलीस स्टेशनचा (Mhasrul Police Station) कायापालट झाला असून यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर नव्या जागेवर स्थलांतर झाले आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन आज राज्याचे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून झाले.
पोलीस स्टेशन म्हटल कि सर्वसामान्यांना न्याय देणार हक्काची जागा. नाशिक शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीने डोके काढले असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस प्रशासन धडक कारवाई करीत आहेत. तर काही ठिकाणी विशेष राबविण्यात येतात. मात्र एखाद्या गुन्ह्यात साधन सामुग्रीच्या कमतरतेमुळे गुन्हेगार सुटतात. अशावेळी सुसज्ज पोलीस स्टेशन असं आवश्यक ठरते. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक लहान मोठे पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे योग्य न्यायनिवाडा केला जातो.
दरम्यान शहरातील पंचवटी (Panchavati) परिसरात खाजगी जागेत सुरु असलेले म्हसरूळ पोलीस स्टेशन आता नव्या जागेत स्थलांतरीत झाले आहेत. यापूर्वी नागरिकांना संबंधित पोलीस स्टेशनचे प्रवेशाची जागा लक्षात येत नसल्याने नागरिक पंचवटी पोलीस स्टेशनकडे जात असायचे मात्र आता नूतन पोलीस स्टेशनकडे जाता येणार आहे. नुकतेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन आज राज्याचे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून झाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner) म्हणाले की, आज म्हसरूळ पोलीस ठाणे इमारतीची बदललेल्या नवीन रचनेमुळे ती अधिकाधिक लोकाभिमूख होणार आहे. पूर्वी इमारतीचे प्रवेशद्वार हे दर्शनी भागात नसल्याने पोलीस ठाणे असूनही ते नागरिकांच्या लवकर लक्षात येत नसे. परंतु आता बदललेले नवीन स्वरूप हे नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणाार आहे. नवीन इमारत प्रशस्त व प्रकाशमय झाल्याने या वास्तूत काम करण्याचा पोलीसांचा उत्साह नक्कीच द्विगुणीत होणार आहे ,असा विश्वास पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. व उपस्थित म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस उप आयुक्त अमोल तांबे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हणाले की, पूर्वी मखमलाबाद, म्हसरूळ व पंचवटी या भागासाठी पंचवटी हे एकच पोलीस ठाणे होते. परंतु शहराची वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी याचे विभाजन करून 01 जानेवारी 2016 रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. सदर ठाणे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था पंचवटी यांच्या इमारतीत भाडेतत्वार सद्यस्थित आहे. सदर इमारतीचे प्रवेशद्वार हे रहिवाशी परिसराच्या दर्शनी भागात नसल्यामुळे नागरिकांच्या चटकन लक्षात येत नव्हते, त्यामुळे नागरिक तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाणे येथे जात होते. आज इमारतीच्या बदलेली इमारतीची रचना नागरिकांच्या नजरेत येईल अशा प्रकारे झाली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होवून त्यांना तात्काळ मदत मिळणार असल्याचे पोलीस उप आयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.