Nashik Rain : नाशिक (Nahsik) शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत असून काल सायंकाळी आलेल्या पावसाने जिल्ह्यातील थैमान घातले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिवाय या पावसात हजारो हेक्टर वराळ पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. 


दरम्यान मागील आठवड्यात दडी मारलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जोरदार हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडवली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी सुरु झालेला पाऊस मध्यरात्री पर्यंत कोसळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्झ्यातील काही भागात नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली. तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी काही नागरिक पाण्यात अडकल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


राज्याच्या काही भागात पुन्हा पावसानं जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.  नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री देखील नाशिकमध्ये तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिन्नर तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तेथील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आलं आहे. तर बाजारपठेमध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिक अडकून पडल्याचे स्थिती होती. रात्री उशिरापर्यंत या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. 


दरम्यान, तर नाशिक शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गंगापूर पानलोड क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळं नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूरमधून सहा हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील मंदिर सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर, दारणा, पालखेड आशा सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर मधून 5 हजार 884 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


असा झाला जिल्ह्यात पाऊस 
नाशिक 13 मिमी, सुरगाणा 14.3, दिंडोरी 13, सिन्नर 165.3, कळवण ९, त्र्यंबकेश्वर 30, निफाड 7.6, इगतपुरी 20, देवळा 28, पेठ 9. हि आकडेवारी 02 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंतची आहे. तर 01 सप्टेंबर चा पाऊस देखील मुसळधार होता. मालेगाव 62 मिमी, बागलाण 56.5 मिमी, सुरगाणा 55. 8 मिमी, इगतपुरी 101.5 मिमी, सिन्नर 80.9 मिमी, त्र्यंबकेश्वर 65. 6 मिमी असा पाऊस होता. तर सिन्नर तालुक्यात कालचा पाऊस हा 125 मिलीमीटर इतका होता. 


सिन्नर तालुक्याला झोडपले.. 
दरम्यान मागील दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून पहिल्या दिवशी 80 मिमी तर दुसऱ्या दिवशी 125 मिमी तर काल रात्री तब्बल 165 मिलीमीटर पावसांची नोंद करण्यात आली आहे. एकूणच या पावसाने सिन्नर करांची दाणादाण उडवली असून सिन्नरच्या सरस्वती नदीला पूर आला आहे. शिवाय बाजारपेठेत पाणी शिरल्याने नाके नागरिक या ठिकाणी अडकून होते. रात्री उशिरापर्यंत या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते.