Balasaheb Thorat : तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis Government) मंत्री मंडळ विस्तार झाला आहे. आता तरी किमान दिल्ली वाऱ्या थांबतील अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कामकाज सुरु करावे, राज्यातील गोरगरिबांना न्याय द्यावा, यासाठी लवकरात लवकर कामकाज सुरु करणे आवश्यक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गेल्या काही दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज ते नाशिकच्या (Nashik) विश्रामगृहावर असताना माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले कि, तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बनले आहे. त्यांना शुभेच्छा तर आजच्या दिवशी देणंच आहे. मात्र हे मंत्री मंडळ कायदेशीर की बेकायदेशीर हे सुप्रीम कोर्ट ठरवेल, इशारा यावेळी थोरात यांनी दिला. तसेच शिंदे मनातरी मंडळात वादग्रस्त असलेले संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली. याबाबत ते म्हणाले कि, महीलांबद्दल यांना आपुलकी आहे की नाही? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत की नाही? याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


तसेच बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले कि, मंत्री मंडळ तर झाले मात्र महिलांचा समावेश तर सोडाच पण महिलांच्या संदर्भात आरोप असलेल्या व्यक्तिमत्त्वाला मंत्री मंडळात सन्मानाने स्थान देणं योग्य नाही. आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्या संदर्भात आरोप झालेले आहेत, त्याची शहानिशा व्हायला पाहिजे, मंत्रिमंडळ होणार की नाही? याची भीती वाटत होती, कि हे दोघेच सरकार चालवणार की काय असं वाटत होतपण आता पहिला टप्पा का होईना झाला आहे. त्यामुळे या सरकारने महागाई कमी करण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


आता दिल्ली वाऱ्या थांबतील!
दरम्यान तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री मंडळ स्थापन झाले असून यात १८ मंत्र्यांचा शपथ विधी पार पडला आहे. त्यामुळे आता गेल्या महिनाभर अतिवृष्टी आणि नुकसान या संकटात होता, पण तुम्ही काही केलं नाही. म्हणून आता तरी दिल्ली वाऱ्या थांबतील आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शेककाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कामकाज सुरु करावे, राज्यातील गोरगरिबांना न्याय द्यावा, यासाठी लवकरात लवकर कामकाज सुरु करणे आवश्यक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


उत्त्तर महाराष्ट्राची भरभराट होईल!
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदारांना मंत्रिपद बहाल केले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ५ मंत्री असून आता उत्तर महाराष्ट्राची भरभराट होईल, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली, याकडे व्यक्तिशः व्यक्तिगत पाहत नसल्याचे ते म्हणाले. देशासह राज्यात ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा त्रास सर्वानाच होत असून याबाबत सर्वांनी एकत्र पद्धतीने लढल पाहिजे. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेनं दावा केला असला, तरी आम्हाला ही जागा मिळावी, हा आमचा आग्रह असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.