Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Nashik Collector Office) चिरेबंदी प्रवेशद्वार लवकरच खुले होणार आहे. चिरेबंदी दगडात उभारण्यात आलेले प्रवेशद्वाराचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. 


नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून अद्ययावत करण्याचे काम सुरू होते. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला (दि 13) रोजी खुले होणार आहे. चिरेबंदी दगडात उभारण्यात आलेले प्रवेशद्वाराचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शेवटचा हात फिरविण्यात येत आहे. इंग्रजांच्या काळात 1869 साली उभारलेल्या चिरेबंदी हवेली असलेल्या आताच्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. स्मार्ट सिटीकडून (Nashik Smart City)_ या वास्तूचे प्रवेशद्वार नव्याने चिरेबंदी साकारण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 आगस्टपासून हे प्रवेशद्वार वाहतुकीस खुले होणार आहे. 


नाशिकचा बहुचर्चित स्मार्ट रोड झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारापाशी रस्त्याची पातळी खाली आली होती. त्यामुळे या ठिकाणी नवे प्रवेशव्दार बांधून देण्याची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत प्रवेशव्दाराला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव असल्याने त्याची प्राचीनता उठून दिसावी यादृष्टीने प्रवेशव्दार बांधून देण्याचे मान्य करण्यात आले. स्मार्ट सीटी कंपनीकडून त्याचे डिझाइन तयार करण्यात येऊन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. तब्बल एक ते दीड वर्ष दगड घडवत ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राचीन वास्तूला शोभेल असे ब्रिटिश आमदनीतील प्रवेशव्दार साकारले आहे. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चिरेबंदी प्रवेशद्वार कामाची निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार राजेंद्र नजन यांनी पाहणी केली. यावेळी डोईफोडे यांनी आर्किटेक्ट शाम लोंढे आणि ठेकेदार शांताराम राख यांच्या कामाचे कौतुक करीत राहिलेली किरकोळ कामे व स्वच्छता तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. या प्रवेशव्दाराच्या निर्मितीसाठी स्मार्टकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे व महाव्यवस्थापक दिग्विजय पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली.


वाहतूक कोंडी फुटणार 
जिल्हाधिकारी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव असल्याने त्याची प्राचीनता उठून दिसावी या दृष्टीने प्रवेशद्वार बांधून देण्याचे स्मार्ट सिटीकडून मेनी करण्यात आले. जवळपास एक ते दीड वर्षांपासून या चिरेबंदी प्रवेशद्वारावर काम सुरु होते. या प्रवेशद्वाराचे काम सुरु असल्याने गेल्या दीड वर्षांपासून ते बंद होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर पादचारी आणि वाहतूक सुरु होती. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी सातत्याने वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते. आता मात्र नवे चिरेबंदी प्रवेशद्वारेस्वागतासाठी सज्ज असल्याने हि वाहतूक कोंडी फुटणार आहे. 


अशी आहे प्रवेशद्वाराची रचना 
चिरेबंदी दगडात उभारण्यात आलेले प्रवेशद्वाराचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शेवटचा हात फिरविण्यात येत आहे.दरम्यान या चिरेबंदी प्रवेशद्वाराची रचना गोलाकार असून मध्यभागी असलेला लामणदिवा येणाऱ्या जाणाऱ्याला आकर्षित करतो. या प्रवेशद्वाराची लांबी ही 68 फूट, उंची 32 फूट असून यावर तब्बल 70 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच मागील दोन वर्ष या प्रवेशद्वाराचे काम चालले.