Nashik News : एकीकडे महागाईने सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले असताना नाशिकमध्ये (Nashik) मात्र 54 रुपयांत एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल पंपावर तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ही सूट आजच्याच दिवस असून राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ही सूट देण्यात आली आहे. 


राज ठाकरे यांचा 54 वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक मनसेने हि सूट नाशिककरांना दिली आहे. यामुळे आज सकाळपासून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची पंपावर गर्दी केली आहे. नागरिकांना महागाईत दिलासा मिळावा यासाठी मनसेने हा उपक्रम राबविल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी  दिली आहे. 54 रुपये लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय मनसे घेतला असल्याच मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश म्हणाले आहे. सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील सिडको परिसरात पेट्रोल पंपावर प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जात आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. 


अशातच राज्यभरातील तमाम मनसैनिकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लिटर पेट्रोल मागे 54 रुपयांची सुट देण्याचा निर्णय नाशकातील मनसे पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. या उपक्रमाविषयी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार  सर्वसामान्य जनतेला महागाई मागे दिलासा मिळावा या हेतूने राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक लिटर मागे पेट्रोल सूट देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितल आहे. शहराध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले कि, देशात इंधनदरवाढीचं सत्र सुरुच आहे. इंधन दरवाढीची सर्वसामान्यांच्या झळ बसतेय. अशात मनसैनिकांनी एक लिटर पेट्रोल मागे 54 रुपये सूट देण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. मात्र मनसैनिकांच्या या उपक्रमामुळे पेट्रोल पंपावर गर्दीच गर्दी पाहायला मिळाली.


राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन


"वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असे  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वाढदिवसानिमित्त  मनसैनिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ  पोस्ट करत राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको  म्हणून यावेळी वाढदिवशी  कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.