Nashik Delhi Air Service : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाशिक -दिल्ली विमानसेवा (Nashik delhi air Service) सुरू झाली असून पहिल्याच दिवशी दिडशेच्यावर प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. त्याचबरोबर प्रवाशांसह व्यापारी, उद्योजकांनी देखील दिल्ली दौरा केला आहे. 


दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली-नाशिक- दिल्ली विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार काल सकाळी नाशिकहून (Nashik) दिल्लीसाठी जेट विमानसेवेने उड्डाण घेतले. जवळपास 180 आसनी असलेल्या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशीच्या दोन फेऱ्यांत 163 प्रवाशांनी हवाई सफरीचा आनंद घेतला.


नाशिक (ओझर) विमानतळ (Ozar Airport) येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दि.04 रोजी नाशिकहून दिल्लीसाठी पहिले उड्डाण भरले. 


तर जेट कंपनीच्या माध्यमातून अहमदाबादमार्गे दिल्ली अशी हॉपिंग फ्लाइटही सुरू आहे. यामुळे आता दिल्लीकरीता नाशिकरांना शनिवार वगळता रोज विमानसेवा होती. मात्र चार ते नऊ ऑगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककरांना दिवसभरात दिल्लीत कामे उरकणे शक्य होणार आहे. काल दिल्लीहुन नाशिक ला येणार्‍या 91 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. तर नाशिकहून दिल्लीला 72 प्रवाशांनी सफर केली. 


वेळापत्रकात बदल
दरम्यान 10 ऑगस्टपासून वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, ही वेळ आणखी सव्वा तास लवकर होणार आहे. नव्या वेळापत्रकामुळे सकाळी 10.45 वाजताच दिल्लीत पोहचणार असुन किमान 5 हजार 100 रुपयांपासून तिकीट बुकिंग असणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुार दिल्लीहून सकाळी 7.56 वा. टेकऑफ नाशिकला सकाळी 9.45 वाजता लँडिंग तर परतीच्या प्रवासात नाशिकहून सकाळी 10.15 वा. टेकऑफ करणार आहे. दिल्लीत दुपारी 12.15 वाजता लँडिंग होणार आहे. ही वेळ कार्यालयीन कामासाठी सोयीची करण्याच्या दृष्टीने दि.10 ऑगस्टपासून या विमान सेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  दिल्लीहून स. 6.35 वाजता टेकऑफ घेऊन  नाशिकला स. 8.30 वाजता लँडिंग होईल त्यानंतर  नाशिकहून स. 9.00 वाजता टेकऑफ घेऊन दिल्लीत स. 10.45 वाजता लँडिंग करण्यात येणार असल्याचे मनिष रावल यांनी सांगितले.