Igatpuri Kasara Tunnel : मुंबई ते नाशिक (Mumbai TO Nashik) या दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणींचा ठरणारा इगतपुरी - कसारा (Igatpuri To Kasara) या दरम्यानच्या लोहमार्गावर 1: 100 ग्रेडीयंट क्षमतेचा टनल व्हावा यासाठीच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली असून याकामी 64 लाखांचा निधी मंजूर केला आहे. इगतपूरी - कसारा हे अंतर 16 कि.मी. चे असून या दरम्यान 1 : 100 ग्रेडीयंटचा टनल झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्च ही वाचणार असल्याची माहीती खा.हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली . 
 

  
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मध्यरेल्वे (Central Railway) मार्गावरून ये- जा करणा - या रेल्वे गाडयांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते.इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मी. चे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाडयांना वाढीव इंजिन, बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी - कसारा या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यान 1.37 एवजी 1.100गेंडीयंट क्षमतेचा मध्ये टनल व्हावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे केंद्राकडे करत होते. 


खासदार गोडसे यांनी वेळोवेळी रेल्वेबोर्डच्या अधिका-यांकडे सततचा पाठपुरावा केला होता.खा गोडसे यांची मागणी न्यायीक असल्याने कसारा - इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाच्या प्रस्तावास तात्पुरती मान्यता दिली होती. कसारा - इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाला अंतिम मान्याता देवून याकामी निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही महीन्यांनपासून खा.गोडसे केंद्राकडे सातत्याने प्रयत्नशिल होते,त्यांचा सततचा पाठपुरावा व आवश्यकता लक्षात घेऊन आज रेल्वेबोर्डाने इगतपुरी - कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावर 1:100 ग्रेंडीयंट क्षमतेचा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अखेर आज अंतिम मान्यता दिली आहे.


64 लाखांच्या निधीला मंजुरी
टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अखेर आज अंतिम मान्यता दिली आहे. यासाठी 64 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. रेल्वेबोर्डाच्या या निर्णयामुळे लवकरच टनल प्रस्ताव सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून घाट परिसरात अधिक व्यासाच्या टनलची निर्मीती होणार आहे.यामुळे मुंबई- नाशिक दरम्यान धावणाऱ्या  रेल्वेगाडयांना घाट परिसरांत सतत थांबावे लागणार नसून गाडयांना बॅकरही लावण्याची गरज पडणार नाही. परिणामी प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. टनल उभारणी झाल्यावर मुंबईहून कसाऱ्यापर्यंत धावणारी लोकल नाशिक पर्यत धावणे शक्य होणार असून या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रूपये खर्च येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. याबरोबरच इगतपुरी - कसारा या दरम्यान चौथी व पाचवी रेल्वे लाईन वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.